IND vs BAN Test: Kuldeep Yadav सारख्या मॅचविनरला बाहेर बसवायच, राहुल द्रविड यांची ही कुठली रणनिती?

IND vs BAN 2nd Test: चांगली गोलंदाजी करणं हा कुलदीप यादवसाठी शाप का? प्रत्येकवेळी त्याला बळीचा बकरा का बनवतात?

IND vs BAN Test: Kuldeep Yadav सारख्या मॅचविनरला बाहेर बसवायच, राहुल द्रविड यांची ही कुठली रणनिती?
Kuldeep yadav-Rahul Dravid
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 12:46 PM

ढाका: टीम इंडियातून अनेकदा खेळाडूंना आपलं स्थान गमवाव लागतं. त्यामागे कारण असतं खराब प्रदर्शन. पण असाही एक खेळाडू आहे, ज्याला चांगल्या प्रदर्शनानंतरही टीम इंडियात स्थान मिळत नाही. या प्लेयरच नाव आहे कुलदीप यादव. बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरला. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पण पुढच्याच सामन्यात त्याला टीम इंडियातून वगळ्ण्यात आलं. कुलदीप यादवला कुठलीही दुखापत झालेली नाही. तो पूर्णपणे फिट आहे.

राहुल द्रविड यांची ही कुठली रणनिती?

टीम इंडियात मीरपूर कसोटीसाठी त्याला स्थान मिळालेलं नाही. टीम इंडियाने कुलदीपच्या जागी जयदेव उनाडकटला टीममध्ये संधी दिलीय. आता अनेक क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडलाय की, प्रत्येकवेळी चांगल्या प्रदर्शनानंतरही कुलदीप यादवला टीममध्ये स्थान का मिळत नाही?. कॅप्टन केएल राहुल आणि हेड कोच राहुल द्रविड यांची मॅचविनर प्लेयरल बाहेर बसवण्याची ही रणनितीच लक्षात आलेली नाही.

सोशल मीडियावर संताप

कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर लोकांनी आपला संताप व्यक्त केला. बांग्लादेशच्या पीचवर टीम इंडिया तीन गोलंदाजांसह उतरली आहे. हे लोकांना पटलेलं नाही. कुलदीप यादवने चांगली कामगिरी करुन त्याला बाहेर बसवण्याची ही पहिली वेळ नाहीय. मागच्या 2-3 वर्षात त्याच्याबरोबर असाच व्यवहार झालाय. त्यामुळे कुठल्याही खेळाडूच्या मनोधैर्यावर परिणाम होईल.

कुलदीप यादवलाच बळीचा बकरा का बनवतात?

2017 साली कुलदीप यादवने टेस्टमध्ये डेब्यु केला. मागच्या पाच वर्षात तो फक्त 8 कसोटी सामने खेळलाय. त्याने कमालीच प्रदर्शन केलय. मात्र, तरीही त्याला टीम बाहेर बसवलं जातं. 14 टेस्ट इनिंगमध्ये कुलदीपने 34 विकेट घेतल्यात. 3 वेळा त्याने पाच विकेट घेतल्यात. कुलदीप यादवने आपल्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच विकेटचा टप्पा गाठला होता. त्यावेळी हेड कोच रवी शास्त्री यांनी, परदेशात कुलदीपच टीम इंडियाचा पहिला स्पिनर असेल, असं म्हटलं होतं. त्यांनी अश्विनऐवजी कुलदीपला प्राधान्य दिलं होतं. पण आज राहुल द्रविड यांनी मॅचविनर कुलदीपच्या जागी अश्विनला प्राधान्य दिलय.

कुलदीपला बांग्लादेश सीरीजआधी टेस्टमध्ये शेवटची संधी कधी मिळालेली?

कुलदीपला शेवटची संधी इंग्लंड विरुद्ध चेन्नई कसोटीत मिळाली होती. त्यानंतर त्याला टीममधून ड्रॉप केलं. कुलदीप यादव जवळपास 22 महिने टेस्ट टीमपासून लांब होता. अखेर त्याला चट्टोग्राम कसोटीत संधी मिळाली. त्याने कमालीची गोलंदाजी करुन 8 विकेट मिळवल्या. पण त्याला दुसऱ्या कसोटीसाठी वगळण्यात आलं. आता कुलदीपला पुन्हा कधी संधी मिळेल? ते ठामपणे सांगता येणार नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.