IND vs NZ : न्यूझीलंडला धक्का, विल्यमसननंतर आणखी एका खेळाडूची टी-20 मालिकेतून माघार

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननंतर वेगवान गोलंदाज काईल जेमिसनला बुधवारपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. कारण, जेमिसनला कसोटी फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

IND vs NZ : न्यूझीलंडला धक्का, विल्यमसननंतर आणखी एका खेळाडूची टी-20 मालिकेतून माघार
New Zealand team
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 1:13 PM

मुंबई : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननंतर वेगवान गोलंदाज काईल जेमिसनला बुधवारपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. जेमिसनला कसोटी फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्यामुळेच त्याने टी-20 मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पहिली कसोटी कानपूर आणि दुसरी कसोटी मुंबईत खेळवली जाणार आहे. 25 नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. (Kyle Jamieson to skip T20 series in India and prepare for Tests)

संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “केन विल्यमसन आणि काइल जेमिसन यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आहे की, हे दोन्ही खेळाडू टी-20 मालिकेत खेळणार नाहीत. कसोटी मालिकेसाठी ते दोघे संघात सामील होणार आहेत.” न्यूझीलंड हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा पहिला विजेता आहे. या संघाने यावर्षी जूनमध्ये भारताचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली होती.

न्यूझीलंड संघाला भारत दौऱ्यावर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

विल्यमसन आणि जेमिसन कसोटी मालिकेसाठी तयारीसाठी

न्यूझीलंडला आपले कसोटी अजिंक्यपद कायम राखण्यात कोणतीही कसर सोडायची नाही. भारताविरुद्धची कसोटी मालिका जिंकणे न्यूझीलंडसाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ही मालिका जिंकण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करेल. संघाचे प्रशिक्षक स्टेड म्हणाले, “विल्यमसन आणि जेमिसन दोघेही कसोटी सामन्याची तयारी करतील. मला वाटते की तुम्हाला असे दिसून येईल की कसोटी संघातील इतर काही खेळाडूही संपूर्ण टी-20 मालिकेत खेळणार नाहीत.”

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोठे आव्हान : विल्यमसन

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने भारत दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचे मोठे आव्हान असल्याचे सांगितले आणि या दौऱ्यासाठी खूप उत्सुक असल्याचे सांगितले.

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा 15 सदस्यीय कसोटी संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साउथी, रॉस टेलर, विल यंग, ​​नील वॅगनर

भारत दौऱ्यासाठी किवी संघात 5 फिरकीपटू

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडने आपल्या कसोटी संघात 5 फिरकी गोलंदाज ठेवले आहेत. किवी संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मी खूप उत्सुक आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीचा खेळ पाहणे रंजक ठरेल. तो म्हणाला की बोल्ट आणि ग्रँडहोमला विश्रांती देण्यामागे संघाचे रोटेशन धोरण आणि बायोबबल हे कारण आहे.

असं आहे टी-20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना- बुधवारी 17 नोव्हेंबर, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपुर, सायंकाळी सात वाजल्यापासून

दुसरा सामना- शुक्रवार, 19 नोव्हेंबर, जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम रांची, सायंकाळी सात वाजल्यापासून

तिसरा सामना- रविवार-21 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स स्टेडियम कोलकाता, सायंकाळी सात वाजल्यापासून

(Kyle Jamieson to skip T20 series in India and prepare for Tests)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.