Srilanka vs Australia Series: लसिथ मलिंगाला मिळाली मोठी जबाबदारी, ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी श्रीलंकेची नवी रणनिती

Sri lanka vs Australia Series: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ (Australia Cricket Team) श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचला आहे. दोन्ही संघांमध्ये तीन T 20 आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

Srilanka vs Australia Series: लसिथ मलिंगाला मिळाली मोठी जबाबदारी, ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी श्रीलंकेची नवी रणनिती
Lasith MalingaImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 8:09 PM

Sri lanka vs Australia Series: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ (Australia Cricket Team) श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचला आहे. दोन्ही संघांमध्ये तीन T 20 आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्याआधी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने (Srilanka Cricket Board) एक नवी रणनिती स्वीकारली आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी लसिथ मलिंगावर (Lasith Malinga) मोठी जबाबदारी सोपवली आहे. मलिंगाला श्रीलंकन क्रिकेट संघाचा बॉलिंग स्ट्रॅटजी कोच नियुक्त केला आहे. “श्रीलंकेचा माजी बॉलिंग लीजेंड आणि माजी वनडे, टी 20 टीमचा कॅप्टन लसिथा मलिंगाला बॉलिंग स्ट्रॅटजी कोच नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांना शुभेच्छा” असं SLC ने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघांमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी मलिंगावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अनुभवाचा श्रीलंकन गोलंदाजांना फायदा होईल

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी मलिंगाच्या अनुभवाचा श्रीलंकन गोलंदाजांना फायदा होईल. गोलंदाजांना टेक्निकल आणि रणनितीक मार्गदर्शन मिळेल. ऑन फिल्ड रणनिती बनवण्यासाठी याचा फायदा होईल, असं स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. मलिंगाचा अनुभव, डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी याचा टीमला टी 20 फॉर्मेटमध्ये फायदा होईल, असा SLC ला विश्वास आहे. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी सुद्धा मलिंगाने अशीच भूमिका निभावली होती.

राजस्थानचा बॉलिंग कोच

आयपीएल 2022 मध्ये लसिथ मलिंगाने राजस्थान रॉयल्सच्या बॉलिंग कोचची भूमिका निभावली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानचा संघ आयपीएलच्या फायनलमध्येही पोहोचला. फायनलमध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.