Ranji Final 2022: मध्य प्रदेशने मुंबईवर विजय मिळवताच महान कोच चंद्रकांत पंडित यांचे डोळे पाणावले, पहा VIDEO

चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) हे देशांतर्गत क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. काल त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशच्या संघाने बलाढ्य मुंबईला पराभूत (Mumbai vs Madhya pradesh) करुन रणजी विजेतेपद मिळवलं.

Ranji Final 2022: मध्य प्रदेशने मुंबईवर विजय मिळवताच महान कोच चंद्रकांत पंडित यांचे डोळे पाणावले, पहा VIDEO
Chandrakant panditImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 12:46 PM

मुंबई: चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) हे देशांतर्गत क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. काल त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशच्या संघाने बलाढ्य मुंबईला पराभूत (Mumbai vs Madhya pradesh) करुन रणजी विजेतेपद मिळवलं. या जेतेपदासह चंद्रकांत पंडित यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. मध्य प्रदेशचं हे पहिलं-वहिलं रणजी विजेतेपद (Ranji Title) आहे. त्यांनी मुंबईचं 42 व रणजी विजेतेपद मिळवण्याच स्वप्न मोडलं. पाचव्या अखेरच्या दिवशी मध्य प्रदेशने 6 विकेट राखून मुंबईवर विजय मिळवला. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही रणजी फायनल झाली. रजत पाटीदारने विजयावर शिक्कामोर्तब करताच मैदानातील कॅमेरे कोच पंडीत यांच्यादिशेने फिरले. चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशच्या या विजयाने भावनिक झाल्याचं दिसलं. ते मैदानावर आले, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मैदानात आल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी चंद्रकांत पंडित यांनी आकाशाकडे बघितलं. कोच म्हणून चंद्रकांत पंडित यांचं हे सहाव रणजी विजेतेपद आहे.

विदर्भाचे कोच होते

भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या चंद्रकांत पंडीत यांनी क्रिकेटपटू म्हणून मध्य प्रदेशच प्रतिनिधीत्व केलं आहे. याआधी चंद्रकांत पंडित विदर्भाचे कोच होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ संघाने 2017/18 साली रणजी विजेतेपद मिळवलं आहे.

भावनिक का झालो, त्याचं कारण सांगितलं?

मैदानावर व्ही. रमन यांना मुलाखत देताना चंद्रकांत पंडित यांनी, विजयी धाव घेतल्यानंतर आपण का भावूक झालो, त्याचं कारण उलगडलं. 1998/99 साली मध्य प्रदेशचा संघ रणजी फायनलमध्ये पोहोचला, त्यावेळी चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे कॅप्टन होते. त्यावेळी याच चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक संघाविरुद्ध अखेरच्या दिवशी त्यांच्या संघाला 247 धावांचं लक्ष्य गाठता आलं नव्हतं.

ज्या मैदानात अपयशी ठरलो, तिथेच….

कॅप्टन म्हणून ज्या मैदानावर अपयश आलं होतं. त्याच मैदानात कोच म्हणून यश मिळणं ही मोठी बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. अखेरच्या दिवशी दुसऱ्याडावात मुंबईला 269 धावा करता आल्या. पहिल्याडावातील आघाडीमुळे मध्य प्रदेशला विजयासाठी 108 धावांचे लक्ष्य मिळाले. ते त्यांनी आरामात पार केलं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.