Hardik pandya नंतर आणखी एक क्रिकेटपटू लग्न न करताच बनला पिता, गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म
सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याने पिता बनल्याची माहिती दिली. क्रिकेट विश्वातील हा एक मोठा खेळाडू आहे. हार्दिक पांड्याने यावर्षी नताशासोबत लग्न केलं. मात्र त्याआधी तो पिता बनला.
मुंबई : टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्या लग्नाआधीच पिता बनला होता. कोरोनाकाळात 30 जुलै 2020 रोजी नताशाने बाळाला जन्म दिला. नताशा आणि हार्दिक पांड्याचा मुलाच नाव अगस्त्य आहे. त्यावेळी हार्दिक-नताशाच्या आई-बाबा होण्याची बरीच चर्चा झाली होती. कारण त्यावेळी दोघांच लग्न झालं नव्हतं. बाळाचा जन्म झाल्यानंतर यावर्षी काही महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केलं. हार्दिक प्रमाणेच क्रिकेट विश्वातील आणखी एक खेळाडू लग्न न करताच बाबा बनला आहे.
या क्रिकेटरने सोशल मीडियावरुन माता-पिता झाल्याची माहिती दिली. इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू जॉनी बेयरस्टो पिता बनला आहे.
त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काय म्हटलय?
दीर्घकाळ दुखापतीमुळे जॉनी बेयरस्टो मैदानाच्या बाहेर होता. इंग्लंडच्या या विकेटकीपर बॅट्समनने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून पिता बनल्याची आनंदाची बातमी दिलीय. “मी आणि माझी गर्लफ्रेंड एडवर्ड बेयरस्टो माता-पिता झालो आहोत. ही बातमी तुमच्यासोबत शेयर करताना मला खूप आनंद होतोय. दोघेही स्वस्थ आहेत” असं जॉनी बेयरस्टोने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलय.
16 जूनपासून सुरु होणार सीरीज
जॉनी बेयरस्टो फोटोमध्ये आपल्या मुलाला फिरवताना दिसतोय. Ashes 2023 आधी बेयरस्टोसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध Action मध्ये परतण्यासाठी सज्ज आहे. 16 जूनपासून Ashes 2023 सीरीजला सुरुवात होणार आहे. क्रिकेट विश्वातील ही एक मोठी सीरीज आहे. जॉनी बेयरस्टो या सीरीजसाठी टीमचा भाग आहे.