Cricket News | Wow, गँरेंटी आहे अशी रिटर्न कॅच याआधी तुम्ही पाहिलीच नसेल, Video च बघा

Cricket News | क्रिकेटच्या खेळात कॅच खूप महत्त्वाची असते. कॅच पकडली किंवा सुटली तर सामन्यात गणित बदलत. म्हणून कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. न्यूझीलंडच्या देशांतर्गत T20 क्रिकेट टुर्नामेंटमध्ये अशीच एक जबरदस्त कॅच पहायला मिळाली.

Cricket News | Wow, गँरेंटी आहे अशी रिटर्न कॅच याआधी तुम्ही पाहिलीच नसेल, Video च बघा
T20 Cricket
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 9:08 AM

Cricket News | कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. क्रिकेटमधील हे प्रचलित वाक्य त्याच्या टीमला सिद्ध करता आलं नाही. कारण त्याची टीम हरली. पण त्या गोलंदाजाने बॉलिंग करताना जी अफलातून रिर्टन कॅच पकडली, त्याला तोड नाही. तुम्ही ही कॅच बघितल्यानंतर तुमच्या तोंडातून Wow, जबरदस्त हेच शब्द बाहेर पडतील. क्रिकेटच्या मैदानात याआधी तुम्ही चांगले झेल पाहिले असतील. एकापेक्षा एक सरस कॅच बघितल्या असतील. पण एका गोलंदाजाला फॉलो थ्रू मध्ये इतका करिश्माई झेल घेताना पाहिल नसेल. ही अद्भूत कॅच पकडणाऱ्या गोलंदाजाच नाव आहे, लोगान वॅन वीक.

लोगान वॅन वीक नेदरलँड्स टीमकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. पण सध्या तो न्यूझीलंडमध्ये आपली प्रतिभा दाखवून देतोय. त्याने न्यूझीलंडच्या देशांतर्गत T20 टूर्नामेंट सुपर स्मॅशमध्ये गोलंदाजी करताना जबरदस्त रिर्टन कॅच घेतली. वीकला ही कॅच घेताना पाहून स्टेडियमवरील प्रेक्षक थक्क झाले. 22 जानेवारीला हा सामना झाला.

सर्वोत्तम रिर्टन कॅच ठरली

कॅटरबरी आणि वेलिंगटन टीममध्ये हा सामना होता. या मॅचमध्ये लोगान वॅन वीक वेलिंगटन टीमकडून खेळत होता. या मॅचमध्ये कॅटरबरी टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 178 धावा केल्या. कॅटरबरीकडून टॉम लॅथमने सर्वाधिक 60 धावा केल्या. लोगान वॅन वीकने एका जबरदस्त कॅचवर त्याला आऊट केलं नसतं, तर लॅथम आणखी मोठी इनिंग खेळला असता. ही क्रिकेटच्या मैदानावर कुठल्याही गोलंदाजाने घेतलेली सर्वोत्तम रिर्टन कॅच ठरली आहे.

किती रन्स देऊन 2 विकेट

लोगान वॅन वीकने घेतलेला हा दुसरा विकेट होता. टॉम लॅथमला त्याने बाद केलं. त्याआधी त्याने हेनरी निकल्स रुपाने पहिली विकेट घेतली. हेनरी 52 रन्सवर आऊट झाला. म्हणजे कॅटरबरीच्या दोन सेट फलंदाजांची विकेट वॅन वीकने घेतली. त्यासाठी त्याने 2 ओव्हरमध्ये 21 रन्स दिले.

जबरदस्त कॅच घेणाऱ्या लोगानची टीम किती रन्सनी हरली?

कॅटरबरीच्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं वेलिंगटन टीमला जमलं नाही. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 160 धावा केल्या. 18 रन्सनी पराभव झाला.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.