IND VS NZ: रविचंद्रन अश्विनने घेतलेली भन्नाट विकेट, नीट डिफेन्स करून बॅट्समन क्लीन बोल्ड
मॅचच्या 79 व्या ओव्हरमध्ये अश्विन बॉलिंग करत होता त्याने बॉल टाकल्यानंतर बॅट्समनने चांगल्या प्रकारे डिफेन्स केला. त्यानंतर बॉलचा टप्पा जमिनीवर पडला आणि पायच्या मागून जाऊन बॉल सरळ विकेटमध्ये घुसला आणि विकेट उडवली. हा प्रकार पाहून कामेंट्री करणाऱ्यांपासून खेळाडू सर्वच चकित झाले.
याआधी क्रिकेटमध्ये आपण काही भन्नाट विकेट पाहिल्या असतील मात्र रविचंद्रन अश्विनने घेतलेली ही विकेट जरा हटके आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजानं अश्विनच्या चेंडूचा यशस्वीरित्या डिफेन्स केला. मात्र तरीही तो क्लीन बोल्ड झाल्याचा भन्नाट प्रकार घडून आलाय. कानपूर टेस्टच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खराब विकेटवर जोरदार डिफेन्स केला, मात्र न्यूझीलंडचा विकेटकिपर, बॅट्समन टॉम ब्लंडेलच्या अशा प्रकारे आऊट होण्याने सर्वांनाच चकीत करुन सोडलं.
अशी अजब विकेट आजपर्यंत पाहिली नसेल
पाचव्या दिवशी कानपूरच्या कठिण पिचवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चागली फलंदाजी केली. काही फलंदाज खराब शॉट खेळून आऊट जरूर झाले, मात्र न्यूझलंडचा विकेटकिपर, बॅट्समन टॉम ब्लंडेल चागल्या प्रकारे डिफेन्स करत, सावध बॅटिंग करत होता. मात्र भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने त्याला अशा प्रकारे आऊट केले की तोही चकित झाला. मॅचच्या 79 व्या ओव्हरमध्ये अश्विन बॉलिंग करत होता त्याने बॉल टाकल्यानंतर बॅट्समनने चांगल्या प्रकारे डिफेन्स केला. त्यानंतर बॉलचा टप्पा जमिनीवर पडला आणि पायच्या मागून जाऊन बॉल सरळ विकेटमध्ये घुसला आणि विकेट उडवली. हा प्रकार पाहून कामेंट्री करणाऱ्यांपासून खेळाडू सर्वच चकित झाले.
Blundell got out in a unlucky way#INDvsNZTestSeries #NZvsIND #INDvsNZ pic.twitter.com/Uost5WLnlO
— WORLD TEST CHAMPIONSHIP NEWS (@RISHItweets123) November 29, 2021
<
न्यूझीलंडने हार टाळली, सामना ड्रॉ
दमदार सुरूवात केल्यानंतर भारताचा सहज विजय होईल असं सर्वांना वाटत होतं, मात्र न्यूझीलंडने चांगला खेळ दाखवत हार टाळली आहे, आणि पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे पुढची कसोटी जो जिंकेल त्याच्या नावे सिरीज होणार आहे. भारतीय गोलंदाज सामना संपेपर्यंत न्यूझीलंडच्या 10 विकेट काढू न शकल्याने सामना अनिर्णित राहिला आहे.