गर्लफ्रेंड मितालीसोबत शार्दुल ठाकूरची एंगेजमेंट, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ शेअर, लग्नाची तारीख ठरली

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur Engagement) एंगेजमेंट केली आहे. जगभरात 'लॉर्ड' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मुंबईकर खेळाडूचा आज (29 नोव्हेंबर) त्याची मैत्रीण मिताली परुळकरसोबत साखरपुडा संपन्न झाला.

गर्लफ्रेंड मितालीसोबत शार्दुल ठाकूरची एंगेजमेंट, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ शेअर, लग्नाची तारीख ठरली
Shardul Thakur - Mittali Parulkar
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 3:42 PM

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur Engagement) एंगेजमेंट केली आहे. जगभरात ‘लॉर्ड’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मुंबईकर खेळाडूचा आज (29 नोव्हेंबर) त्याची मैत्रीण मिताली परुळकरसोबत साखरपुडा संपन्न झाला. दोघांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईत पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दरम्यान, या साखरपुड्याला भारतीय क्रिकेटपटूंपैकी कोणी आलं होतं की नव्हतं याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, शार्दुल ठाकूर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर लग्न करू शकतो. (Lord Shardul Thakur gets engaged with his girlfriend Mittali Parulkar, wedding to take place after T-20 WC 2022)

30 वर्षीय शार्दुल ठाकूर टीम इंडियाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला होता. तो सध्या ब्रेकवर आहे. त्याने आतापर्यंत चार कसोटी, 15 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तो नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. यापूर्वी आयपीएल 2021 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. अलीकडच्या काळात शार्दुल तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत आहे. कसोटीत त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर त्याने अर्धशतके झळकावली होती.

त्यामुळे त्याचे खूप कौतुक झाले.

शार्दुलची कारकीर्द

शार्दुल ठाकूर हा मूळचा मुंबईजवळच्या पालघर या उपनगरातला रहिवासी आहे. 2017 मध्ये त्याने टीम इंडियामध्ये पदार्पण केले. तर 2018 मध्ये त्याचे कसोटी पदार्पण झाले. त्याने आतापर्यंत कसोटीत 14, वनडेत 22 आणि टी-20 मध्ये 31 बळी घेतले आहेत. शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्मा यांनी एकत्र अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दोघांनीही खेळातील बारकावे एकच प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याकडून शिकून घेतले आहेत. शालेय जीवनात त्याने सहा चेंडूंत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रमही केला होता.

पुढे मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्याने टीम इंडियात स्थान मिळवले. मुंबईला रणजी चॅम्पियन बनवण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा होता. आयपीएलमध्ये त्याचे पदार्पण पंजाब किंग्जकडून झाले होते. पण नंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये येऊन त्याला यश मिळाले. 2018 आणि 2021 आयपीएलचे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई संघाचा तो भाग होता. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने चेन्नईकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

IND vs NZ : टीम इंडिया धर्मसंकटात, विराट कोहलीसाठी कोणता फलंदाज बलिदान देणार?

‘माझी भारतीय संघात निवड करु नका’; हार्दिक पंड्याची निवड समितीला विनंती

ख्रिस गेल घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणार? ‘युनिव्हर्स बॉस’कडून निवृत्तीचे संकेत<

/p> (Lord Shardul Thakur gets engaged with his girlfriend Mittali Parulkar, wedding to take place after T-20 WC 2022)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.