Prerak Mankad, IPL 2023 : ‘प्लेअर ऑफ द मॅच’ खेळाडूवर चाहत्यांचा हल्ला, काय फेकून मारलं?; आयपीएलमध्ये काय घडलं?

सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ जायंट्स दरम्यान काल खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रेरक मांकडवर प्रेक्षकांनी हल्ला केला. त्याच्यावर नट आणि बोल्ट फेकून मारले. त्यामुळे मांकड चांगलाच त्रस्त झाला होता.

Prerak Mankad, IPL 2023 : 'प्लेअर ऑफ द मॅच' खेळाडूवर चाहत्यांचा हल्ला, काय फेकून मारलं?; आयपीएलमध्ये काय घडलं?
Prerak MankadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 9:14 AM

नवी दिल्ली : आयपीएल 2023ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. या सीजनमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित होत आहे. कुणाची बॅट तळपत आहे तर कुणाच्या गोलंदाजीची चलती आहे. त्यामुळे या सीजनला क्रिकेटप्रेमींनी तुफान प्रतिसाद दिला आहे. हा सीजन जसा सर्वांसाठी रोमांचक ठरलाय. तसेच या सीजनमध्ये काही गोंधळही होताना पाहायला मिळत आहे. काल 13 मे रोजी सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंटस दरम्यान असाच एक मुकाबला पार पडला. हा सामना रोमांचक ठरला आणि तसा या सामन्यात राडाही झाला. सनराईजर्सच्या चाहत्यांनी क्रिकेटपटू प्रेरक मांकड आणि कोचवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

सनराईजर्सचे फॅन्स लखनऊ सुपरच्या डगआऊटवर नट आणि बोल्टने हल्ला करत असल्याची सुरुवातीला बातमी येऊन धडकली होती. त्याला लखनऊ सुपरचे फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स यांनी ट्विट करून उत्तर दिलं होतं. लखनऊच्या डगआऊटवर खेळाडूंवर नट आणि बोल्ट फेकले जात होते, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. चाहत्यांकडून लॉन्ग ऑनवर फिल्डिंग करणाऱ्या लखनऊच्या प्रेरक मांकडच्या डोक्यावर नट आणि बोल्ट फेकून मारले जात होते. त्यामुळे मांकड प्रचंड त्रस्त झाला होता, असंही ऱ्होड्स यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मैदानावरच भिडले

हे प्रकरण अधिक तापल्याने मैदानातही त्याचे पडसाद उमटले. मांकडच्या डोक्यावर नट आणि बोल्ट फेकून मारल्याची घटना समोर आल्यानंतर लखनऊच्या सपोर्ट स्टाफ आणि अंपायर्समध्ये मैदानावरच वादावादी झाली. त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या शाब्दिक चकमकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

क्लासेनला दंड

सनराईजर्स हैदराबादच्या 19व्या ओव्हर दरम्यान ही संपूर्ण घटना घडली. या घटनेनंतर इनिंग संपल्यावर सनराईजर्सचे खेळाडू हेनरिख क्लासेन सुद्धा वाद घालताना दिसला. त्यामुळे शिस्तभंग केल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. दंड म्हणून त्याची सामन्यातील 10 टक्के फी कापली जाणार आहे.

प्रेरक ठरला हिरो

दरम्यान, कालचा सामना अत्यंत रोमांचक ठरला. सनराईजर्सने आधी फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 6 बळी देत 182 धावा कुटल्या. तर लखनऊ सुपर जायंटसने हा सामना अवघ्या चार चेंडू आधीच जिंकला. तास बळी देऊन लखनऊने दमदार विजय मिळवला. प्रेरक मांकड लखनऊच्या विजयाचा हिरो बनला. त्याने 45 चेंडूत 64 धावा केल्या. तो नाबाद राहिला. त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

म्हणजेच सनराईजर्सच्या फॅन्सने ज्या खेळाडूला निशाणा बनवलं, ज्याच्यावर नट आणि बोल्ट फेकून हल्ला केला तोच खेळाडू या सामन्याचा हिरो ठरला. आयपीएलमधील प्रेरकचा हा दुसरा सामना होता. यापूर्वीचा सामनाही तो सनराईजर्सच्या विरोधातच खेळला होता. या सामन्यात त्याला खातेही खोलता आलं नव्हतं. तो नाबाद राहिला होता.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.