LSG vs CSK IPL 2022: CSK ला आज दीपक चाहरची आठवण आली असेल, लखनौच्या इविन लुईसच्या बॅटमधून फोर, सिक्सचा पाऊस

LSG vs CSK IPL 2022: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) आज स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. इविन लुईस (Evin Lewis) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) लखनौच्या विजयाचे हिरो ठरले.

LSG vs CSK IPL 2022: CSK ला आज दीपक चाहरची आठवण आली असेल, लखनौच्या इविन लुईसच्या बॅटमधून फोर, सिक्सचा पाऊस
आयुष बदोनी-लुईस Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 12:24 AM

मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) आज स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. इविन लुईस (Evin Lewis) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) लखनौच्या विजयाचे हिरो ठरले. पण त्याची पायाभरणी केएल राहुल आणि क्विंटन डि कॉकच्या जोडीने केली. नाणेफेक जिंकून केएल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. रॉबिन उथाप्पा, मोईन अलीने ज्या पद्धतीने सुरुवात केली, ते पहाता केएल राहुलचा निर्णय चुकला असंच वाटलं. चेन्नई सुपर किंग्सने आज प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभारला. लखनौ सुपर जायंट्सला हे लक्ष्य पार कठीण जाईल असं वाटलं होतं. पण लखनौने शेवटच्या षटकापर्यंत खेचल्या गेलेल्या या सामन्यात आरामात विजयी लक्ष्य गाठलं.

‘या’ दोघांनी केली विजयाची पायाभरणी

इविन लुईसच्या 23 चेंडूतील आक्रमक 55 धावा आणि आयुष बदोनीच्या नऊ चेंडूतील नाबाद 19 धावांच्या बळावर लखनौने विजय मिळवला. सलामीवीर केएल राहुल आणि क्विंटन डि कॉकने या विजयाची पायाभरणी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. केएल राहुलने 40 धावा केल्या. सुरुवातीपासूनच डिकॉक आणि राहुलने आक्रमक फलंदाजी केली. डि कॉकने 45 चेंडूत 61 धावा केल्या. यात नऊ चौकार होते. त्यानंतर लुईसने 23 चेंडूत 55 धावा फटकावताना सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. आयुष बदोनीने 9 चेंडूत 19 धावा केल्या. यात त्याने दोन षटकार लगावले.

एका षटकात 25 धावा तिथेच सामना फिरला

लखनौने चेन्नईवर विजय मिळवला, त्याचं प्रमुख कारण आहे चेन्नईची सुमार गोलंदाजी. चेन्नईचा आज सात गोलंदाज वापरले. पण त्यांचा एकही गोलंदाज प्रभावी वाटला नाही. शिवम दुबेला सामन्यातील 19 वे षटक दिले. पण त्याच षटकात लुईस-बदोनी जोडीने हल्लाबोल करुन 25 धावा वसूल केल्या. तिथेच लखनौचा विजय निश्चित झाला. खरंतर लखनौला विजयासाठी 12 चेंडूत 34 धावांची आवश्यकता होती. पण एकाच षटकात 25 धावा गेल्याने शेवटच्या षटकात नऊ धावा करणं फार कठीण नव्हतं.

चेन्नईची गोलंदाजीची बाजू किती कमकुवत आहे ते आज दिसून आलं. चेन्नईला आज दीपक चाहरची उणीव प्रकर्षाने जाणवली असेल. दीपक चाहर दुखापतग्रस्त आहे. चेन्नईचा एकही गोलंदाज लखनौच्या फलंदाजांना रोखू शकतो, असं वाटलं नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.