LSG vs DC IPL 2022: KL Rahul ची शानदार हाफ सेंच्युरी, एकाहाताने मारलेला SIX चुकवू नका, VIDEO
LSG vs DC IPL 2022: वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकी केएल राहुल खूप सहजतेने धावा वसूल करतो. राहुलच्या फलंदाजीत टायमिंग आणि ड्राइव्हची झलक पहायला मिळते.
मुंबई: वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (LSG vs DC) सामना सुरु आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील हा 45 वा सामना आहे. लखनौचा कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला आहे. बातमी लिहित असताना लखनौ सुपर जायंट्सच्या 13 षटकात एकबाद 129 धावा झाल्या आहेत. सलामीवीर क्विंटन डि कॉक 23 धावांवर शार्दुल ठाकूरच्या (Shardul thakur) गोलंदाजीवर आऊट झाला. पण त्याने कॅप्टन केएल राहुलवर काही फरक पडला नाही. त्याने आपली आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवली. केएल राहुल या सीजनमध्ये भरपूर फॉर्ममध्ये आहे. त्याची विकेट मिळवणं, प्रतिस्पर्धी संघांना जमत नाहीय. चौफेर फटकेबाजी करण्याची त्याची क्षमता आहे. राहुलने 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं. यात तीन चौकार आणि तीन षटकार आहेत.
राहुलचे परफेक्ट क्रिकेटिंग शॉट्स
केएल राहुलने एकाहाताने मारलेला SIX पहाण्यासाठी इथे क्लिक करा
वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकी केएल राहुल खूप सहजतेने धावा वसूल करतो. राहुलच्या फलंदाजीत टायमिंग आणि ड्राइव्हची झलक पहायला मिळते. ज्याला आपण परफेक्ट क्रिकेटिंग शॉट्स म्हणतो. अशी फलंदाजी सध्या केएल राहुल करतोय. आज लखनौ विरुद्धच्या सामन्यातही त्याची तशीच फलंदाजी सुरु आहे. आयपीएल 2022 च्या या सीजनमध्ये राहुलने आतापर्यंत दहा सामन्यात 59.71 च्या सरासरीने 418 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि एक अर्धशतक आहे.
Leading from the front, Captain @klrahul11 brings up a fine FIFTY off 35 deliveries.
Live – https://t.co/wmwJlb9D5J #DCvLSG #TATAIPL pic.twitter.com/hei1tXuGJh
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
ललित यादवच्या गोलंदाजीवर हल्लाबोल
केएल राहुल आज लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतोय. पावरप्लेमध्ये त्याने दिल्लीचा फिरकी गोलंदाज ललित यादवचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ललितच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. एका षटकात एक सिक्स आणि दोन चौकार लगावले. कव्हरला मारलेला सिक्स तर लाजबाव होता. एकाहाताने राहुलने ही किमया साधली. सध्या केएल राहुलला रोखणं अवघड आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय.