LSG vs KKR IPL 2022: लुईसच्या वनहँडेड कॅचमुळे लखनौची टीम प्लेऑफमध्ये, ‘त्या’ अविश्वसनीय झेलचा VIDEO पहा
LSG vs KKR IPL 2022: क्रिकेट रसिकांना आज पुन्हा एकदा एक रोमांचक सामना पहायला मिळाला. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 210 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुले LSG ची टीम सहज सामना जिंकेल, असा अंदाज अनेकांनी बांधला होता.
मुंबई: क्रिकेट रसिकांना आज पुन्हा एकदा रोमांचक सामना पहायला मिळाला. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 210 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुले LSG ची टीम सहज सामना जिंकेल, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. पण प्रत्यक्षात मैदानात मात्र दुसरच घडलं. शेवटच्या चेंडूपर्य़ंत हा सामना रंगला. लखनौ सुपर जायंट्सने अवघ्या 2 रन्सनी सामना जिंकून प्लेऑफमध्ये (Playoff) धडक मारली. रिंकू सिंहमुळे (Rinku Singh) केकेआरचा संघ सामना जिंकण्याच्या स्थितीमध्ये पोहोचला होता. 17 व्या षटकात केकेआरची धावसंख्या 150 असताना आंद्रे रसेल आऊट झाला. सर्वांना वाटलं सामना लवकर संपणार. पण रिंकू सिंहने सामन्यात जान आणली. त्याने तुफान खेळ दाखवला. शेवटच्या 20 ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर लुईसच्या अविश्वसनीय झेलमुळे लखनौला सामना जिंकता आला.
BIG GAME PLAYER ?? pic.twitter.com/1mx2zF1zJR
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 18, 2022
रिंकू सिंहने कमालच केली
अन्यथा रिंकू सिंहने कमालच केली होती. मार्कस स्टॉयनिस शेवटचं षटक टाकत होता. पाचव्या चेंडूवर रिंकू सिंह बाद झाला. लुईसने लांबून धावत येत, एका हाताने अप्रतिम झेल घेतला. शेवटच्या चेंडूवर केकेआरला विजयासाठी 3 धावांची गरज होती. पण स्टॉयनिसने उमेश यादवला बोल्ड केलं. लखनौच्या 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने आठ बाद 208 धावा केल्या. रिंकूने 15 चेंडूत 40 धावा चोपल्या. यात दोन चौकार आणि चार षटकार होते.
आजच्या सामन्यात जान आणणाऱ्या रिंकू सिंहची बॅटिंग एकदा इथे क्लिक करुन पहाच
डि कॉक-राहुलची ऐतिहासिक कामगिरी
लखनौला प्लेऑफमध्ये पोहोचवणारी लुईसची ती वन हँडेड कॅच इथे क्लिक करुन एकदा पहाच
क्विंटन डि कॉक आणि कॅप्टन केएल राहुलने आज आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. दोघांनी बिनबाद 210 धावा केल्या. क्विंटन डि कॉकने 70 चेंडूत 140 धावा चोपल्या. यात 10 चौकार आणि 10 षटकार होते. कॅप्टन केएल राहुलने चांगली साथ दिली. त्याने 51 चेंडूत 68 धावा फटकावल्या. यात तीन चौकार आणि चार षटकार होते.
एका ओव्हरमध्ये पाच चौकार
LSG च्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना केकेआरने खराब सुरुवात केली होती. पहिल्याच षटकात वेंकटेश अय्यर शुन्यावर बाद झाला होता. दुसरा सलामीवीर अभिजीत तोमरही लवकर तंबूत परतला. त्यांची दोन बाद 9 अशी स्थिती होती. पण त्यानंतर नितीश राणा (42) आणि श्रेयस अय्यरने (50) डाव सावरला. राणाने तर आवेश खानच्या एका ओव्हरमध्ये पाच चौकार ठोकले. दोघांनी 3 षटकात 50 धावा चोपल्या. दोघांनी 27 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली.
शेवटचं रोमांचक षटक
शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी 19 धावांची गरज होती. रिंकून स्टॉयनिसनच्या पहिल्या तीन चेंडूंवर तीन चौकार ठोकले. विजयासाठी दोन चेंडूत फक्त 3 धावांची आवश्यकता होती. पाचव्या चेंडूवर रिंकून शॉर्ट कव्हर्सला मारलेला फटका एविन लुईसने लांबून धावत येत सुंदररित्या झेलला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर स्टॉयनिसने उमेशला क्लीन बोल्ड करुन उरल्या सुरल्या आशा संपवल्या.