LSG vs MI IPL 2023 Eliminator : लखनऊच्या एका प्लेयरच्या मनात मुंबईबद्दल जुनी खुन्नस, त्याच्यापासून सर्वात जास्त धोका

LSG vs MI IPL 2023 Eliminator : मुंबई इंडियन्सने बाहेर केलं, लखनऊचा तोच प्लेयर बनला मार्गातला मोठा अडथळा. मुंबई इंडियन्सला या सीजनमध्ये दुसऱ्यांदा पाणी पाजण्यासाठी त्याने कंबर कसली आहे.

LSG vs MI IPL 2023 Eliminator : लखनऊच्या एका प्लेयरच्या मनात मुंबईबद्दल जुनी खुन्नस, त्याच्यापासून सर्वात जास्त धोका
LSG vs MI IPL 2023 Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 12:36 PM

चेन्नई : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये आज एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या मॅचमधील पराभूत टीमच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. विजेत्या टीमला फायनल गाठण्यासाठी क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सशी खेळाव लागेल. आजच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्ससमोर आपल्या जुन्या खेळाडूंच आव्हान असणार आहे. हा प्लेयर मुंबईच्या टीम बरोबर आपला जुना हिशोब चुकता करण्यासाठी उत्सुक आहे. कारण मुंबई इंडियन्सने या प्लेयरला बाहेर केलं. त्याला रिटेन केलं नाही.

मुंबई इंडियन्सला या सीजनमध्ये दुसऱ्यांदा पाणी पाजण्यासाठी त्याने कंबर कसली आहे. याआधी मागच्या आठवड्यात दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या. त्यावेळी लखनऊने मुंबईवर 5 धावांनी विजय मिळवला होता.

थोडी मेहनत, थोड्या नशिबाने मुंबई प्लेऑफमध्ये

मुंबईसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या या खेळाडूच नाव आहे, कृणाल पांड्या. थोडी मेहनत आणि थोड्या नशिबाच्या बळावर मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. पण क्वालिफायर 2 च तिकीट मिळवण्यासाठी कृणाल पांड्यच आव्हान आहे.

तो मुंबईच्या अडचणी वाढवेल

मुंबई इंडियन्सची टीम फायनलमध्ये पोहोचणार की, नाही हे बऱ्याच प्रमाणात कृणाल पांड्याच्या निर्णयावर अवलंबून असेल. तो लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे. सीजनच्या मध्यावर दुखापतीमुळे लखनऊचा नियमित कॅप्टन केएल राहुल टुर्नामेंटमधून बाहेर गेला. कृणाल पांड्याच नेतृत्व पाहून तो मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढवेल असं दिसतय.

त्याने रचली मुंबईच्या पराभवाची स्क्रिप्ट

मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कृणाल पांड्याने 49 धावांची खेळी केली. टीम संकटात असताना त्याने मार्कस स्टॉयनिसच्या साथीने मिळून डाव सावरला. महत्वाची पार्ट्नरशिप केली. त्यानंतर धावगती वाढवण्यासाठी स्वत: रिटायर्ड हर्ट झाला.

तिन्हीवेळा लखनऊ विजयी

मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायजीने IPL 2022 च्या मेगा ऑक्शनआधी कृणाल पांड्याला रिलीज केलं होतं. त्यानंतर त्याला लखऊने विकत घेतलं. लखनऊ आणि मुंबईमध्ये आतापर्यंत 3 सामने झालेत. तिन्हीवेळा लखनऊची टीम जिंकली आहे. चेन्नईमध्ये होणारा सामना वेगळा आहे. कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या मैदानावर लखनऊने विजय मिळवला, तर खऱ्या अर्थाने मुंबई बरोबर हिशोब चुकता होईल. कारण त्यामुळे मुंबईच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.