LSG vs MI : मुंबई-लखनौ सामन्याआधी टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, टीमची ताकद दुप्पट
Lucknow Super Giants vs Mumbai Indians : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याआधी टीममध्ये घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे संघाची ताकद वाढली आहे. जाणून घ्या तो कोण आहे?

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमेनसामने असणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ या हंगामात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामने गमावले आहे. तर फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे.त्यामुळे या दोन्ही संघांचा हा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. हा सामना लखनौच्या घरच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईला जिंकायचं असेल तर लखनौचा गड भेदावा लागणार आहे. त्याआधी मुंबईची टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लखनौच्या गोटात घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. लखनौने या गोलंदाजासाठी 8 कोटी रुपये मोजले आहेत.
लखनौच्या गोटात आकाश दीप परतला आहे. आकाश दीप फिट झाला आहे. मुंबई विरूद्धच्या सामन्याआधी आकाश टीमसह जोडला गेला आहे. आकाश दीप फिट असल्याचं एनसीएने जाहीर केलं आहे. आकाश दीप परतल्याने लखनौच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे. आता आकाशला मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी संधी देतात का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
आकाश दीप याने 2022 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आकाशने आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलेलं. त्यानंतर आकाशला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. आकाश दीपची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही निवड झाली होती. आकाशला या दौऱ्यात दुखापत झालेली. त्यामुळे आकाशला मुकावं लागलं होतं. क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, आकाश दीप याला पूर्णपणे फिट असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
आकाश दीप याच्याआधी आवेश खान हा देखील टीममध्ये परतला आहे. त्यानंतर आता आवेशसह आकाश दीप हा देखील परतला आहे. त्यामुळे लखनौच्या गोटात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या गोलंदाजांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात या दोघांपैकी कुणाला संधी मिळते? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.