Marcus Stoinis IPL 2023 : स्टॉयनिसच्या इनिंगमधील याच 12 बॉलनी मुंबईची कशी वाट लावली, ते समजून घ्या, VIDEO
Marcus Stoinis IPL 2023 : शेवटच्या 12 चेंडूंमध्ये असा झाला मुंबई इंडियन्सचा घात. मुंबई इंडियन्सने सुरुवातीच्या ओव्हर्समध्येच लखनऊ सुपर जायंट्सला अडचणीत आणलं होतं. पण लास्टच्या 3 ओव्हर्समध्ये गेम फिरला.
लखनऊ : लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार खेळाडू मार्कस स्टॉयनिसने पुन्हा एकदा तुफानी बॅटिंग केली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा त्याने चांगलाच समाचार घेतला. लखनऊने मंगळवारी आपल्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध खराब सुरुवात केली होती. पण अखेरीस त्यांनी 177 धावांपर्यंत मजल मारली. लखनऊची टीम 175 ची वेस ओलांडू शकली, ते मार्कस स्टॉयनिसच्या तुफानी बॅटिंगमुळे. त्यामुळेच लखनऊच्या टीमने सन्मानजनक धावसंख्या उभारली.
शेवटच्या 12 चेंडूंमध्ये किती धावा चोपल्या?
स्टॉयनिसच्या इनिंगमधील शेवटच्या 12 चेंडूंमध्ये मुंबई इंडियन्सचा घात झाला. त्याच्या 35 चेंडूत 45 धावा झाल्या होत्या. पण त्यानंतरच्या 12 चेंडूत त्याने 44 धावा तडकावल्या. त्याने 18 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सिक्स मारुन आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या ओव्हरमध्ये त्याने 1 सिक्स आणि 3 फोर मारले. स्टॉयनिस एवढ्यावरच थांबला नाही. त्याने 19 व्या ओव्हरमध्ये 4 चेंडू खेळून 2 सिक्स मारले. लास्ट ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने आकाश मडवालच्या गोलंदाजीवर सिक्स मारला.
लखनऊने लास्ट 3 ओव्हर्समध्ये 54 धावा केल्या. त्यामुळे एकवेळ अडचणीत असलेला लखनऊचा डाव 177 या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचला.
Six hitting ke nawab ?, Marcus Stoinis lajawaab ?
Is the Aussie ? powerhouse the man to rescue @LucknowIPL‘s playoff chances??#IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 #EveryGameMatters pic.twitter.com/5BCwZJXolK
— JioCinema (@JioCinema) May 16, 2023
टीमसाठी दोघे बनले संकटमोचक
एकवेळ लखनऊच्या 3 विकेट 35 रन्सवर गेल्या होत्या. दीपक हुड्डा, क्विंटन डिकॉक आणि प्रेरक मांकड आऊट झाले होते. मात्र त्यानंतर कॅप्टन कृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिसने डाव सावरला. दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. पांड्या अर्धशतक पूर्ण करणार होता. पण त्याआधीच तो रिटायर्ड हर्ट झाला. पांड्याने 42 चेंडूत एक चौकार आणि एक सिक्ससह 49 धावा केल्या. पांड्याच्या नंतर स्टॉयनिसने जबाबदारी घेतली व तुफानी बॅटिंगच प्रदर्शन केलं. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 178 रन्सच टार्गेट होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी 5 बाद 172 धावा केल्या. मुंबईचा 5 रन्सनी पराभव झाला.