Virat vs Gambhir IPL Fight | गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात या खेळाडूमुळे वाद, कोण आहे तो?
विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचं वाजलं. मात्र या दोघांच्या वादासाठी एक खेळाडू कारणीभूत ठरलाय. व्हीडिओत बघा कोण आहे तो.
लखनऊ | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने लखनऊ सुपर जायंट्स संघावर लो स्कोअरिंग सामन्यात 18 रन्सने विजय मिळवला. आरसीबीचा हा आयपीएल 16 व्या सिजनमधील 5 विजय ठरला. आरसीबीने या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली. लखनऊसमोर 127 धावांचं विजयी आव्हान होतं. पण आरसीबीच्या गोलंदाजांनी खरंच कमाल केली. आरसीबीच्या सहा गोलंदाजांनी विकेट्स घेत एकमेकांना चांगली मदत केली आणि लखनऊचा घरच्या मैदानात धुव्वा उडवला. आरसीबीच्या गोलंदाजांनी लखनऊचा बाजार 19.5 ओव्हरमध्ये 108 धावांवरच उठवला. सामन्यानंतर आरसीबी कॅप्टन विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्स टीमचा कोचिंग टीमचा भाग असलेला गौतम गंभीर यांच्यात कडाक्याचं वाजलं. मात्र या मागे नक्की कारण काय होतं, या वादाची पार्श्वभूमी काय होती, याबाबत आपण जरा इस्कटून जाणून घेऊयात.
इथून फुटला वादाचा नारळ
विराट आणि गौतम गंभीर यांच्या दोघांमध्ये वाद होण्याचा कारण ठरली ती लखनऊच्या डावातील 17 वी ओव्हर. याच 17 व्या ओव्हरमध्ये सर्व महाभारत घडलं. लखनऊचा बॅट्समन नवीन उल हक आणि विाट कोहली या 17 व्या ओव्हरमध्ये भिडले.या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र या वेळेस अमित मिश्रा आणि अंपायरने मध्यस्थी केली आणि तातपूरता वाद संपवला. मात्र विराट आणि नवीनच्या डोक्यात हा विषय होता.
सामना संपल्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू रांगेत हस्तांदोलन करण्यासाठी आले. यावेळेस नवीनने विराट रोखून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. इथे खरी आग लागली. दोघेही एकमेकांवर बरसले. पण इथेही जरा मध्यस्थी झाली आणि विषय संपला.
आता इथून पुढे खरा राडा सुरु झाला. आधीच 17 व्या ओव्हरचं प्रकरण, त्यानंतर हस्तांदोलन. आता थेट विराट आणि गौतम गंभीरच आमनेसामने आले. दोघांनी एकमेकांची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र हे चित्र पाहून हे मारामारी करतात की काय, असंच वाटत होते. पण तसं सुदैवाने झालं नाही.
विराट आणि गंभीर यांच्या दोघांमध्ये असलेला जिव्हाळा क्रिकेट चाहत्यांना माहितीय. हे दोघे पहिल्यांदा आयपीएल 2013 मध्ये आमनेसामने भिडले होते. तेव्हा गंभीर केकेआरकडून खेळत होता. तर विराट आरसीबीचाच भाग होता. तेव्हापासून या दोघांमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये 36 चा आकडा तयार झाला.
त्यानंतर 10 एप्रिल 2023 रोजी आरसीबी विरुद्ध लखनऊ यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात लखनऊने आरसीबीवर विजय मिळवला होता. यानंतर विराट आणि गंभीरने हस्तांदोलन केलं मात्र त्यांच्या नात्यात पडलेली गाठ दिसून आली. पण त्यानंतर क्रिकेट चाहत्यांना सुखावह चित्र पाहायला मिळालं. त्या सामन्यानंतर विराट आणि गंभीरने एकमेकांना घट्ट मीठी मारली. इतकंच नाही, तर दिल्लीकर खेळाडू म्हणून फोटोही काढले. यावेळेस त्यांच्यासोबत लखनऊ कोचिंग टीममधील विजय दहीया हा देखील होता. विजय, गौतम आणि विराट हे तिघेही दिल्लीकर, त्यामुळे या तिघांनी फोटोशूट केलं. इथे विराट आणि गंभीरमध्ये पॅचअप झाल्याचं क्रिकेट चाहत्यांना वाटलं. पण कसंल काय.
विराट-गंभीर वादाला इथून सुरुवात
#ViratKohli This is the moment when whole fight started between Virat Kohli and LSG Gautam GambhirAmit MishraNaveen ul haq#LSGvsRCB pic.twitter.com/hkId1J33vY
— Mehulsinh Vaghela (@LoneWarrior1109) May 1, 2023
नवीन उल हकने खाजून खरुन काढली. यात विराटचाही तितकाच दोष. विषय वाढला आणि पुन्हा विराट आणि गंभीर भिडले. या तिघांनी मैदानात जो काही कुटाना केला त्यासाठी या तिघांविरुद्ध काय कारवाई होते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.