Virat Kohli: ‘प्रत्येक फलंदाजाला नशिबाची….’, विराटच्या फॉर्मवर प्रश्न विचारणाऱ्यांना गावस्करांच रोखठोक उत्तर
मुंबई: क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधील कर्णधारपद गेल्यानंतर विराट कोहली (Virat kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करतोय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिन्ही वनडे सामन्यांमध्ये (India vs West indies) विराट कोहली अपयशी ठरला. आज तिसऱ्या वनडेमध्ये विराट शुन्यावर बाद झाला. त्यामुळे विराटवर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. विराटवर टीका करणाऱ्यांना भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil gavaskar) यांनी उत्तर दिलं […]
मुंबई: क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधील कर्णधारपद गेल्यानंतर विराट कोहली (Virat kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करतोय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिन्ही वनडे सामन्यांमध्ये (India vs West indies) विराट कोहली अपयशी ठरला. आज तिसऱ्या वनडेमध्ये विराट शुन्यावर बाद झाला. त्यामुळे विराटवर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. विराटवर टीका करणाऱ्यांना भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil gavaskar) यांनी उत्तर दिलं आहे. सुनील गावस्करांनी टीकाकारांना विराटने दक्षिण आफ्रिके विरुद्ध वनडे सीरीजमध्ये झळकवलेल्या दोन अर्धशतकांची आठवण करुन दिली आहे. 14 ऑगस्ट 2019 नंतर विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेलं नाहीय. पण 42.50 च्या सरासरीने त्याने 765 धावा करताना दहा अर्धशतक झळकावली आहेत. यातील दोन शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्धची आहे. मागच्या महिन्यात वनडे सीरीजमध्ये विराटने पहिल्या सामन्यात 51 तर तिसऱ्या सामन्यात 65 धावांची खेळी केली होती.
विराटने वेस्ट इंडिज विरुद्ध आतापर्यंत 2000 धावा केल्या आहेत. विराटचा हा आवडता विरोधी संघ आहे. 2019 मध्ये विडिंज विरुद्धच त्याने सलग दोन अर्धशतक झळकवली होती. पण तरीही सध्या सुरु असलेल्या मालिकेत त्याचा वेस्ट इंडिज विरुद्ध संघर्ष सुरु आहे.
गावस्कर काय म्हणाले? वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या दोन वनडेमध्ये तो आठ आणि 18 धावांवर बाद झाला. गावस्करांच्या मते मागच्या दोन सामन्यात विराटला नशीबाची साथ नव्हती. “प्रत्येक फलंदाजाला नशीबाची साथ लागते. एका ठराविक परिस्थिती फलंदाजाचा फटका चुकतो. काही वेळेला चेंडू बॅटला स्पर्श करुन जातो, पण कॅच सुटते किंवा क्षेत्ररक्षाच्या पुढ्याच चेंडू पडतो. मागच्या दोन सामन्यात विराटला नशीबाची साथ नव्हती. याच विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन अर्धशतक झळकावली हे विसरुन चालणार नाही. विराट आऊट ऑफ फॉर्म आहे, असं नाहीय, तर त्याला नशीबाची साथ मिळत नाहीय” असं गावस्कर स्टार स्पोटर्सवर बोलताना म्हणाले.
Luck factor is not with Virat kohli Sunil gavaskar india vs west indies odi series