एका चेंडूत दिल्या 14 धावा… IPL च्या पदार्पण सामन्यात घाबरला हा खेळाडू

Shamar Joseph, KKR vs LSG Match in IPL 2024: जोसेफ यांच्यासाठी हा सामना एखादे दु:खद स्वप्नापेक्षा कमी नव्हता. लखनऊ संघाचा कर्णधार के.एल. राहुल यांनी मोठ्या विश्वासाने त्याला पहिले षटक दिले. परंतु हे षटक चांगलेच महाग ठरले.

एका चेंडूत दिल्या 14 धावा... IPL च्या पदार्पण सामन्यात घाबरला हा खेळाडू
के.एल.राहुलसोबत जोसेफ.
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 7:44 AM

आयपीएल सामन्याचा रोमांच सुरु आहे. आयपीएलमधून अनेक चांगले खेळाडू मिळत आहे. रविवारी मुंबई विरुद्ध चेन्नई आणि कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही सामन्यात क्रिकेट प्रेमींना फटकेबाजीचा आनंद मिळाला. कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या ईडन गार्डन मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा आठ गडीने पराभव केला. कोलकाता संघाला मिळालेले 162 धावांचे लक्ष्य 16 व्या षटकात पूर्ण करण्यात आले. या सामन्यात लखनऊच्या संघाने बदल केले होते. वेगवान गोलंदाज शमर जोसेफ याला खेळण्याची संधी दिली. त्याचा हा आयपीएलमध्ये डेब्यू मॅच होती. वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार जोसेफने आगळीवेगळी कामगिरी केली.

जोसेफ यांच्यासाठी हा सामना एखादे दु:खद स्वप्नापेक्षा कमी नव्हता. लखनऊ संघाचा कर्णधार के.एल. राहुल यांनी मोठ्या विश्वासाने त्याला पहिले षटक दिले. या षटकातील पहिल्या पाच चेंडूत केकेआर संघातील सलामीचे फलंदाज फिल साल्ट आणि सुनील नरेन यांनी फक्त आठ धावा केल्या. परंतु सहावा चेंडू त्यांच्यासाठी चांगला ठरला. या चेंडूवर त्यांनी तब्बल 14 धावा केल्या.

हे सुद्धा वाचा

अशा झाल्या 14 धावा

षटकाचा शेवटचा चेंडू टाकताना जोसेफ याची लय बिघडली. त्याच्यासमोर स्ट्राइकवर साल्ट होता. हा बॉल टाकल्यानंतर त्याने नोबॉल टाकला. त्यानंतर दुसरा बॉल वाइड टाकला. त्यानंतर पुन्हा वाइट बॉल टाकला, त्यावर चौकार गेला. मग टाकलेल्या तीन चेंडूत सात धावा गेल्या होत्या. मग पुन्हा चौथा चेंडू टाकला, तो नोबॉल गेला. त्यानंतर मिळालेल्या फ्रिहिटवर साल्ट याने षटकार खेचला. या पद्धतीने शेवटच्या चेंडूत 14 धावा त्याने दिल्या. एकूण या षटकात 10 चेंडू टाकत 22 धावा जोसेफ याने दिल्या.

असे होते षटक

  • पहिला चेंडू : फिल सॉल्टला एकही धाव करता आली नाही.
  • दुसरा चेंडू: फिल सॉल्टने लेग बायद्वारे एकच धावा काढल्या.
  • तिसरा चेंडू: सुनील नरेन याने चौकार मारला.
  • चौथा चेंडू: सुनील नरेन याने 2 धावा घेतल्या.
  • पाचवा चेंडू: सुनील नरेनने एक धाव घेतली.
  • सहावा चेंडू: फिल सॉल्ट नो-बॉलवर धावा करू शकला नाही.
  • सातवा चेंडू: वाइड बॉल.
  • आठवा चेंडू: वाईड बॉलवर चौकार, एकूण ५ धावा
  • नववा चेंडू: जोसेफ नो-बॉल टाकला.
  • दहावा चेंडू: फिल सॉल्टने षटकार ठोकला.
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.