IPL प्रमाणे रंगणार महाराष्ट्र प्रिमीयर लीग, MPL मध्ये पुणे आणि नाशिकसह हे 6 संघ भिडणार
IPL प्रमाणेच आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MPL लीग सुरु करणार आहे. येत्या १५ जून पाहून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.
मुंबई : IPL सुरु असतानाच महाराष्ट्रातील क्रिकेट चाहत्यांना आणखी एक खुशखबर मिळाली आहे. कारण आता महाराष्ट्र प्रिमीयर लीग (MPL) सुरु होणार आहे. यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) आणि डी डी स्पोर्टस यांच्यात करार देखील झाला आहे. या लीगमध्ये 3 टीम महिलांच्या असणार आहेत. 15 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. एमपीएलमध्ये एकूण 6 संघ खेळणार आहेत. पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव हे सहा संघ या लीगमध्ये असणार आहेत. ( maharashtra premier league 2023 from June 16 )
आयपीएल प्रमाणे या लीगमध्ये खेळाडूंना सुविधा मिळणार आहेत. आयपीएलचेच नियम या लीगमध्ये लागू असणार आहेत. आयपीएलला तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने देखील महाराष्ट्रात टी २० लीग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील क्रिकेट खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रातील सर्वात मोठी टी 20 स्पर्धा भरवणार आहे. आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केलीये.