Rajvardhan Hangargekar: उस्मानाबादच्या राजवर्धनने वयात ‘झोल’ केला?अंडर 19 वर्ल्डकप विजयात महत्त्वाची भूमिका
संघाच्या विजयात या खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. वयात गडबड केल्याचा आरोप आहे. उस्मानाबादचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरवर (Rajvardhan Hangargekar) वय लपवल्याचा आरोप झाला आहे.
मुंबई: भारताच्या अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूवर गंभीर आरोप झाला आहे. संघाच्या विजयात या खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. वयात गडबड केल्याचा आरोप आहे. उस्मानाबादचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरवर (Rajvardhan Hangargekar) वय लपवल्याचा आरोप झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजवर्धन हंगरगेकरच खरं वय 21 वर्ष आहे. पण वय लपवून तो अंडर 19 (Rajvardhan Hangargekar Age Controversy) वर्ल्डकपमध्ये खेळला. हंगरगेकरने फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांमध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. टीम इंडियाने इंग्लंडला नमवून वर्ल्डकप जिंकला होता. खेळ आणि युवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी राजवर्धन हंगरगेकरवर वय लपवल्याचा आरोप केला आहे. ओमप्रकाश बकोरिया या IAS अधिकाऱ्याने BCCI ला एक पत्र पाठवलं आहे. त्यात राजवर्धन हंगरगेकर विरोधात पुरावे दिले आहेत.
वयात काय घोटाळा केला?
धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल गुप्ता यांनी राजवर्धन हंगरगेकरच्या जन्मतारखेची पुष्टि केली आहे. ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. ‘सामना’ दैनिकामध्ये या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. राजवर्धन धाराशिवच्या टेरना पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. शाळेच्या रेकॉर्डनुसार, पहिली ते सातवीपर्यंत हंगरगेकरची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 होती. पण आठवीमध्ये नवीन प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी अनधिकृतपणे राजवर्धनची जन्मतारीख बदलून 10 नोव्हेंबर 2002 केली. 14 जानेवारी ते पाच फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत राजवर्धन हंगरगेकरचं वय 21 वर्ष होतं.
काय कारवाई होईल?
बीसीसीआयच्या चौकशीत हंगरगेकर दोषी आढळला तर त्याच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते. 2017-18 मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघातील सलामीवीर मनजोत कालरा सुद्धा वयाच्या वादामध्ये अडकला होता. त्याच्यावर एक वर्ष बंदी घालण्यात आली होती. असं झालं तर हंगरगेकरसाठी तो मोठा झटका असेल.
राजवर्धनची विश्वचषकातली कामगिरी
अंडर-19 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात राजवर्धनने 38 धावांत एक विकेट घेतली होती. यानंतर आयर्लंडविरुद्ध त्याने 17 धावांत एक विकेट घेतली आणि नाबाद 39 धावा केल्या. युगांडाविरुद्ध त्याने आठ धावांत दोन बळी घेतले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने बांगलादेशच्या एका फलंदाजाला बाद केले. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला एकही विकेट घेता आली नाही. फायनलमध्येही त्याला इंग्लंडविरुद्ध विकेट मिळाली नव्हती.
Maharashtra Osmanabad Rajvardhan hangargekar age controversy bcci india u 19 world cup