Mumbai Indians मधील प्रमोशनचा परिणाम, महेला जयवर्धने यांनी ‘या’ टीमची सोडली साथ

महेला जयवर्धने आता 'या' टीमसाठी कोचिंग करणार नाहीत

Mumbai Indians मधील प्रमोशनचा परिणाम, महेला जयवर्धने यांनी 'या' टीमची सोडली साथ
Mahela mahela jayawardeneImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 6:31 PM

मुंबई: श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू महेला जयवर्धनेकडे क्रिकेटची चांगली समज आहे. मुंबई इंडियन्सला जयवर्धनेच्या क्षमतेची चांगली कल्पना आहे. त्यामुळेच जयवर्धनेकडे मुंबई इंडियन्सने मोठी जबाबदारी दिली आहे. फ्रेंचायजीने लीगमधील जयवर्धनेची भूमिका ग्लोबल केलीय. महेला जयवर्धने श्रीलंकेच्या मीडल ऑर्डरचा भक्कम आधारस्तंभ होता. श्रीलंकेच्या डावाला आकार देण्यात त्याने अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली होती. हाच जयवर्धने आता मुंबई इंडियन्सचा ग्लोबल हेड आहे. त्यामुळेच जयवर्धनेने आता इंग्लंडची लीग ‘द हण्ड्रेड’मधील साऊदर्न ब्रेव संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय.

जयवर्धने यांच्यावर काय-काय जबाबदाऱ्या आहेत?

महेला जयवर्धने साऊदर्न ब्रेवचा कोच होता. त्याच्या कोचिंगखाली टीमने ‘द हण्ड्रेड’च्या ओपनिंग सीजनमध्ये विजेतेपद मिळवले होते. 2023 मध्ये जयवर्धने या टीमसोबत दिसणार नाही. कारण मुंबई इंडियन्समध्ये जयवर्धनेकडे आता मोठी जबाबदारी आहे. आता महेला जयवर्धनेकडे आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या परफॉर्मन्सचीच जबाबदारी नाहीय, तर मुंबई इंडियन्स अमीरात आणि मुंबई इंडियन्स केपटाऊन या टीमच्या परफॉर्मन्सची सुद्धा जबाबदारी आहे. मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने यावर्षी सप्टेंबर महिन्यात महेला जयवर्धनेला ग्लोबल हेड बनवलं.

महेला जयवर्धन यांनी अचानक निर्णय घेतला का?

साऊदर्न ब्रेव संघाची साथ सोडण्याचा निर्णय जयवर्धने यांनी अचानक घेतलेला नाही. मागच्या आठवड्यात त्यांनी ब्रेवच्या मॅनेजमेंटची भेट घेतली. मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या नव्या जबाबदाऱ्यांची कल्पना दिली. या मीटिंगनंतर साऊदर्न ब्रेवने महेला जयवर्धनेच्या रिप्लेसमेंटचा शोध सुरु केलाय. ESPNcricinfo ने ही माहिती दिली.

जयवर्धनेच्या कोचिंगखाली मुंबई इंडियन्सने किती वेळा किताब जिंकला?

महेला जयवर्धने 2017 साली मुंबई इंडियन्सशी जोडले गेले. तेव्हापासून या टीमने 3 वेळा किताब जिंकलाय. याचमुळे मुंबई इंडियन्स फ्रेंचायजींचा त्यांच्यावर विश्वास आहे. साऊदर्न ब्रेवसोबतही त्यांची सुरुवात विजयाने झाली. 2022 चा सीजन त्यांच्यासाठी चांगला नव्हता. मुंबई इंडियन्सच्या टीमने या सीजनमध्ये संघर्ष केला. साऊदर्न ब्रेव टीमचीही तीच परिस्थिती होती. पॉइंटस टॅलीमध्ये ही टीम 7 व्या नंबरवर होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.