IPL लिलावापूर्वी महेंद्रसिंग धोनी थायलंडमध्ये करतोय मस्ती, पाहा VIDEO
आयपीएलच्या लिलावापूर्वी महेंद्रसिंग धोनी त्याच्या कुटुंबासह थायलंडमध्ये सुट्टी घालवत आहे. तो लवकरच आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. CSK ने त्याला पुढील हंगामासाठी अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे. त्यामुळे तो आणखी एक हंगाम खेळणार हे देखील निश्चित झाले आहे
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आपल्या कुटुंबासह थायलंडमध्ये आहे. त्या ठिकाणी तो आनंद घेत आहे. धोनीची मुलगी झिवा हिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिने नुकतेच काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये धोनी समुद्राच्या लाटांचा आनंद लुटताना दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन दिले आहे, ‘बीच डे!’ धोनी सनग्लासेस आणि काळा बनियान घालून समुद्रात पोहताना दिसतोय. जीवाच्या अकाऊंटवरून नेत्रदीपक सूर्यास्ताची काही सुंदर फोटो तिने शेअर केली आहेत.
फ्लाइटमध्ये आधी धोनी आणि त्याचे कुटुंबिय बेंगळुरूतील एका कुटुंबाशी चर्चा करत होते. काही दिवसांपूर्वी एमएस धोनी आणि त्याच्या कुटुंबाचा आणखी एक गोंडस व्हिडिओ व्हायरल झाला होता. फ्लाइटमध्ये, बेंगळुरूमधील एका कुटुंबाशी गप्पा मारताना दिसत होता.
इंस्टाग्राम युजर नेत्रा गौडा हिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात तिच्या कुटुंबाचा धोनी, साक्षी आणि झिवा यांच्याशी संवाद आहे. तिने याचे तिच्या पतीचे “स्वप्न सत्यात उतरले” आणि त्यांच्या मुलीसाठी एक आदर्श वाढदिवस भेट म्हणून वर्णन केले आहे.
View this post on Instagram
धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम आहे. चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार रुतुराज गायकवाड आणि अनुभवी रवींद्र जडेजाला तेवढ्याच रकमेत कायम ठेवले आहे. एमएस धोनीवर चार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
रिटेन्शन : रुतुराज गायकवाड (18 कोटी), मथिशा पाथिराना (13 कोटी), शिवम दुबे (12 कोटी), रवींद्र जडेजा (18 कोटी), एमएस धोनी (4 कोटी) रिटेन्शन : 65 कोटी, पर्स: 55 कोटी, RTM: 1