Duleep Trophy : फक्त दोन दिवसात गोलंदाज होण्याऱ्या मानव सुथारची जबरदस्त कामगिरी, 7 निर्धाव षटकं आणि 7 विकेट

देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून आहे. कारण या स्पर्धेतून भविष्यातील खेळाडूंची निवड होणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूची कामगिरी पाहिली जात आहे. यात इंडिया सी संघाकडून खेळणाऱ्यालेफ्ट आर्म स्पिनर मानव सुथारने कमाल केली. वडिलांची इच्छा फलंदाज बनवण्याची होती. पण दोन दिवसात गोलंदाज होणं निश्चित झालं.

Duleep Trophy : फक्त दोन दिवसात गोलंदाज होण्याऱ्या मानव सुथारची जबरदस्त कामगिरी, 7 निर्धाव षटकं आणि 7 विकेट
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 3:51 PM

दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू असून दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फेल झाले आहेत. दुसरीकडे, ज्या खेळाडूंना कोणी ओळखत नाही अशा खेळाडूंनी बाजी मारली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं दिसत आहे. फिरकीपटू मानव सुथार इंडिया सी संघाकडून मैदानात उतरला आहे. त्याच्या फिरकीच्या जादूपुढे इंडिया डी संघाची दाणादाण उडाली आहे. इंडिया डी संघाने इंडिया सी संघाविरुद्ध दुसऱ्या डावात 236 धावा केल्या. डी संघाचा निम्म्यातून अधिक संघ एकट्या मानव सुथारने तंबूत पाठवला. मानव सुथारने 19.1 षटकं टाकली आणि 49 धावा देत 7 गडी बाद केले. यात त्याने सात षटकं निर्धाव टाकली हे विशेष..खरं तर मानव सुथारच्या वडिलांची इच्छा त्याला फलंदाज करण्याची होती. पण मानव सुथारच्या नशिबात गोलंदाज होणंच लिहिलं होतं. आता तसंच होताना दिसत आहे. दुलीप ट्रॉफीसह देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची आकडेवारी असंच सांगत आहे.

मानव सुथारने क्रिकेट धडे राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील क्रिकेट कोचिंग क्लबमध्ये गिरवले. मानवच्या वडिलांनी मुलाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी या अकादमीत प्रवेश मिळवून दिला होता. प्रशिक्षक धीरज शर्मा यांना सांगितलं की, मुलाला स्फोटक फलंदाज बनवायचं आहे. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. धीरज शर्मा यांनी दोन दिवस मानव सुथारचा खेळ पाहिला आणि त्यानंतर त्यांना कळलं की मानव फलंदाजीसाठी नाही तर गोलंदाजीसाठी बनला आहे. मानवच्या प्रशिक्षकांनी त्या दृष्टीने त्याची पायाभरणी करण्यास सुरुवात केली. आता त्यांना त्यात यश मिळताना दिसत आहे. वयाच्या 22 व्या वर्षी मानव सुथारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये यश मिळवलं आहे. मानव सुथारने आतापर्यंत 14 प्रथम श्रेणी सामन्यात 65 गडी बाद केले आहेत.

मानव सुथारने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एकूण 8 गडी बाद केले. पहिल्या डावात एक गडी बाद केला होता. पण दुसऱ्या डावात त्याच्या गोलंदाजीचा कहर दिसला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे सी संघाला विजय मिळवता आला. सुथारने श्रीकर भरतला दोन्ही डावात बाद केले. याशिवाय देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, अक्षर पटेल यासारख्या दिग्गज खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. मानव सुथारची गोलंदाजी पाहता त्याला लवकरच कसोटी संघात स्थान मिळू शकतं. सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघात आहे. पण एकच सामना खेळला आहे. त्यामुळे त्याला रिलीज केलं तर त्याच्यासाठी मोठी बोली लागेल यात शंका नाही.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.