IPL New Team Auction 2021: थोड्याच वेळात बीसीसीआयकडून 2 नव्या संघांची घोषणा, मँचेस्टर, अदानी, RPSG रेसमध्ये
दुबई येथील भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा थरार संपताच, आयपीएलशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. ही बातमी मोठी यासाठी आहे कारण, बीसीसीआय लवकरच दोन नव्या संघांची घोषणा करणार आहे.
दुबई : येथील भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा थरार संपताच, आयपीएलशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. ही बातमी मोठी यासाठी आहे कारण, बीसीसीआय लवकरच आयपीएलमधील दोन नव्या संघांची घोषणा करणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत आपण फक्त 8 संघांची चढाओढ पाहिली आहे. पण 2022 चा हंगाम थोडा वेगळा असेल, जिथे 8 नव्हे तर 10 संघ खेळताना दिसतील. दोन नवीन संघांसाठी, बीसीसीआयने 6 शहरांची निवड केली आहे, ज्यासाठी बोली सुरू आहे. (Manchester United owner, Adani Group among 22 entities bidding for new IPL teams 2022)
अहवालानुसार, दोन नवीन संघांसाठी 10 बोली लावण्यात आल्या आहेत. यापैकी अदानी ग्रुप, RPSG, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, ग्लेझर्स आणि अरुबिदों यांनी सर्वात महागड्या बोली लावल्या आहेत. अहवालांनुसार, अहमदाबाद, इंदूर आणि लखनौ येथून संघ खरेदी करण्यासाठी मोठी स्पर्धा आहे.
2 संघांसाठी 10 कंपन्यांनी बोली लावली आहे. या निविदांसाठी तपासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जो कोणी बीसीसीआयचे सर्व मापदंड पूर्ण करेल, तो संघाचा मालक बनण्याचा हक्कदार असेल. तांत्रिक बोलीची छाननी केल्यानंतर आर्थिक बोली खुली होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 ते 3.30 या वेळेत 2 नवीन संघांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Bid submissions done ✅
Verification process underway here in Dubai ?
The Big Announcement soon ? pic.twitter.com/LbXGwxnrYR
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2021
इतर बातम्या
India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल
T20 World Cup 2021 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडू शकतात, वाचा कसा, कुठे होऊ शकतो आमना-सामना
(Manchester United owner, Adani Group among 22 entities bidding for new IPL teams 2022)