IND vs SL: श्रीलंका दौऱ्यातून कृणालसह 7 भारतीय खेळाडू बाहेर, दुसऱ्या टी-20 मध्ये ‘या’ खेळाडूंना संधी
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणालला कोरोनाची बाधा झाल्यामुळे 27 जुलैला होणारा दुसरा टी-20 सामना पुढे ढकलण्यात आला. हा सामना आज पार पडणार आहे.
कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरा टी-20 सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या (Krunal Pandya) कोरोनाबाधित झाल्याने संपूर्ण संघाची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे मंगळवार 27 जुलैचा सामना आज (बुधवार) 28 जुलैला होणार आहे. दरम्यान या सामन्यात भारताचे अनेक महत्त्वाचे खेळाडू विलगीकरणाच्या नियमांमुळे सामन्याला मुकणार आहेत. भारताचे 7 महत्त्वाचे खेळाडू कृणालच्या संपर्कात आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरणात ठेवले आहे.
भारतीय संघाने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असून आज दुसरा सामना जिंकून भारत मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. पण भारताचे कृणाल पंड्यासह 7 महत्त्वाचे खेळाडू स्पर्धेबाहेर गेले आहेत. यामध्ये हार्दिक पांड्या, इशान किशन, कृष्णप्पा गौतम, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल आणि दीपक चहार यांचा समावेश आहे. हे सर्व सध्या विलगीकरणात आहे.
या खेळाडूंना मिळू शकते संधी
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, सध्या संघातील महत्त्वाचे खेळाडू बाहेर गेल्यामुळे इतर राखीव खेळाडूंना संधी मिळणार आहे. य़ात गोलंदाजी विभागात इशान पोरेल, संदीप वारियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग यांचा समावेश आहे. तर आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
इतर बातम्या
अष्टपैलू हार्दीक पंड्या होऊ शकतो संघाबाहेर, ‘या’ दोन गोलंदाजांमुळे संघातील स्थानाला धोका
सूर्यकुमारचं अर्धशतक, भुवनेश्वरचे 4 बळी, भारताची श्रीलंकेवर 38 धावांनी मात
(Many indian Players Along with krunal pandya out of sri lanka tour 2nd t20 preview)