SRH मधून बाहेर पडलेल्या डेव्हिड वॉर्नरवर अनेक संघांच्या नजरा, लिलावाआधीच मिळतायत ऑफर्स

सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे (Sunrisers Hyderabad) मार्ग आता वेगळे झाले आहेत.

SRH मधून बाहेर पडलेल्या डेव्हिड वॉर्नरवर अनेक संघांच्या नजरा, लिलावाआधीच मिळतायत ऑफर्स
डेव्हिड वॉर्नर
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 10:51 PM

मुंबई : सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे (Sunrisers Hyderabad) मार्ग आता वेगळे झाले आहेत. त्यांच्यातील मतभेदाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दुसऱ्या टप्प्यात आधी वॉर्नरचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. संघव्यवस्थापन एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी त्याला खेळाडूंच्या डगआऊटमध्ये येण्यासदेखील मज्जाव केला. वॉर्नर आणि SRH आता विभक्त झाले आहेत. हा निर्णय खेळाडू आणि फ्रँचायझी दोघांनी परस्पर मान्य केला आहे. (Many IPL teams has Eye on David Warner, getting Offers before mega auction)

2016 मध्ये वॉर्नरने ज्या टीमला चॅम्पियन बनवले होते त्याच संघाने त्याला अशा प्रकारची वागणूक दिली. आयपीएलमध्ये तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा हा खेळाडू या हंगामात बरेच सामने बेंचवर बसून राहिला. सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरला बाहेर बसवून स्पष्ट केले आहे की, पुढील वर्षी ते त्याला संघात रिटेन करणार नाहीत (संघात कायम ठेवणार नाहीत). लीगच्या अखेरीस, डेव्हिड वॉर्नरने एक भावनिक संदेश देखील लिहिला, त्यात त्याने म्हटले की, तो यापुढे हैदराबाद संघाचा भाग राहणार नाही. मला अनेक चांगल्या आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद, असे लिहीत त्याने चाहत्यांचे आभार मानले. तुम्ही सर्व आमच्या टीमसाठी नेहमीच एक शक्ती आहात. तुमच्या जबरदस्त पाठिंब्याबद्दल मी तुमचे आभार मानू शकत नाही. हा एक अद्भुत प्रवास होता. मी आणि माझे कुटुंब तुम्हा सर्वांची खूप आठवण काढू.

वॉर्नरवर अनेक संघांची नजर

या हंगामाच्या सुरुवातीला वॉर्नर हैदाराबाद संघाचा कर्णधार होता, पण खराब फॉर्ममुळे त्याचे कर्णधारपद काढून टाकण्यात आले आणि केन विल्यमसनला संघाची कमान देण्यात आली. मात्र, यानंतरही संघाचा पराभवाचा सिलसिला कायम राहिला. वॉर्नरने या मोसमात 8 सामन्यांत 195 धावा केल्या होत्या, त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले होते. आता वॉर्नरसह, चाहतेदेखील पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावाची वाट पाहात आहेत, जिथे वॉर्नरवर मोठी बोली लावली जाईल अशी अपेक्षा आहे. वॉर्नर केवळ कर्णधार म्हणूनच नव्हे तर फलंदाज म्हणूनही खूप यशस्वी झाला आहे. अशा स्थितीत अनेक संघांच्या नजरा त्याच्यावर असतील. बातमीनुसार, आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी अनेक फ्रँचायझींनी वॉर्नरशी आधीच संपर्क साधला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लिलावात दोन नवीन संघही सहभागी होणार आहेत, त्यामुळे त्यांनादेखील कर्णधार शोधावा लागेल. या संघांसाठी वॉर्नर चांगला पर्याय असेल.

वॉर्नरने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केल्या भावना

डेव्हि़डने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तो म्हटले आहे की, ”हे महत्त्वाचं नाही की कोण तुमच्या समोर खरेपणाने वागतं. हे महत्त्वाचं आहे की कोण तुमच्या पाठीमागे खरेपणाने वागतं” या पोस्टमधून जणू काही वॉर्नर हैद्राबाद संघ प्रशासनालाच त्याच्या भावना बोलून दाखवत आहे.

इतर बातम्या

IPL 2021, DC vs CSK : आजच्या सामन्याचा निकाल ‘या’ 5 खेळाडूंच्या हातात

IPL 2021, DC vs CSK Head to Head Records : चेन्नईचे किंग्स भिडणार दिल्लीच्या नवाबांशी, कोण पोहचणार अंतिम सामन्यात?

यंदा चेन्नईला IPL जिंकायचीय?, तर धोनीला करावा लागणार मोठा त्याग, या हुकमी एक्क्यावर दाखवावा लागणार भरोसा

(Many IPL teams has Eye on David Warner, getting Offers before mega auction)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.