IPL 2022: सहा सीजनमध्ये फक्त चार फिफ्टी, बेभरवशाच्या खेळाडूवर पैशांचा पाऊस, मिळणार 11 कोटी रुपये

स्टोइनिस आयपीएलमध्ये 56 मॅच खेळला आहे. फक्त तीस विकेट त्याने घेतल्यात. 2020 हा त्याच्यासाठी सर्वात चांगला सीजन होता. जेव्हा त्याने 13 विकेट घेतल्या होत्या.

IPL 2022: सहा सीजनमध्ये फक्त चार फिफ्टी, बेभरवशाच्या खेळाडूवर पैशांचा पाऊस, मिळणार 11 कोटी रुपये
marcus stoinis
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 8:13 PM

लखनऊ: मेगा ऑक्शनआधी अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायजीना त्यांच्या प्रत्येकी तीन-तीन खेळाडूंची यादी सोपवावी लागणार आहे. लखनऊ फ्रेंचायजी केएल राहुल, (KL Rahul) मार्कस स्टोइनिस (Marcus Stoinis) आणि रवी बिष्णोई या तीन खेळाडूंना करारबद्ध करणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. ईएसपीएन-क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुलला लखनऊ फ्रेंचायजीने नंबर 1 खेळाडू म्हणून निवडले आहे. त्यामुळे त्याला निर्धारीत फीस स्लॅबनुसार 15 कोटी रुपये दिले जातील.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिसला नंबर 2 खेळाडू म्हणून निवडलं आहे. त्याला 11 कोटी रुपये दिले जातील. रवी बिष्णोईला चार कोटी रुपये मिळतील. यामुळे लखनऊ फ्रेंचायजीकडे लिलावाच्यावेळी खरेदीसाठी 60 कोटी रुपये पर्समध्ये असणार आहेत.

स्टोइनिसला 11 कोटी? राहुलला 15 आणि बिष्णोईला चार कोटी समजू शकतो. पण मार्कस स्टोइनिसला 11 कोटी? स्टोइनिस 2015 पासून आयपीएलमध्ये आहे. 2016 साली तो आयपीएलमध्ये खेळला. आयपीएल 2020 वगळता कुठलाही एक सीजन तो पूर्ण खेळू शकलेला नाही तसचं तो कमालही दाखवू शकलेला नाही. स्टोइनिस आयपीएलमध्ये 56 मॅच खेळला आहे. फक्त तीस विकेट त्याने घेतल्यात. 2020 हा त्याच्यासाठी सर्वात चांगला सीजन होता. जेव्हा त्याने 13 विकेट घेतल्या होत्या.

फक्त 914 धावा बॅटिंग बद्दल बोलायचं तर स्टोइनिस आतापर्यंत 914 धावा केल्या आहेत. यात केवळ चार अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. 2020 मध्ये सर्वाधिक 352 धावा केल्या होत्या. त्या सीजनमध्ये तीन अर्धशतकं झळकावली होती. त्या सीजनमध्ये स्टोइनिसचा स्ट्राइक रेट (148.52) होता. तो पंजाब किंग्ज, आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला आहे. पण कुठल्याही संघात त्याचं स्थान पक्क नव्हतं. याचा अर्थ स्पष्ट आहे, वेगवेगळ्या संघांनी स्टोइनिसला घेतलं पण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.

पाँटिंगमुळे दिल्लीने घेतलं कोच रिकी पाँटिगमुळे स्टोइनिसला दिल्ली कॅपिटल्स संघात स्थान मिळाले. आयपीएल 2020 मध्ये दिल्लीने चांगले प्रदर्शन केले. पण 2021 मध्ये स्टोइनिसने 10 सामन्यात केवळ 89 धावा केल्या. 27 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. गोलंदाजीत 19.3 षटके टाकूनही त्याला एक विकेट मिळाली नाही.

सर्वाधिक रक्कमेला पंजाबने विकत घेतलं स्टोइनिसला 2018 मध्ये पंजाबने 6.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण वर्षभरातच त्याला आरसीबीकडे दिले. आरसीबीनेही एका सीजननंतर स्टोइनिसला सोडून दिलं. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याला 4.8 कोटी रुपयांना विकत घेतलं.

marcus stoinis set to get 11 crore from lucknow franchise ipl 2022-mega auction

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.