IND vs ENG : इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, आणखी एक खेळाडू तिसऱ्या कसोटीला मुकणार, गोलंदाजी विभागाच्या अडचणी वाढल्या
इंग्लंडचा संघ भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खास कामगिरी करत नसून पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. त्यात आता आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
लंडन: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला दोन दिवस शिल्लक असताना इंग्लंड संघावर आणखी एक संकट कोसळलं आहे. आधीच संघातील महत्वाचे गोलंदाज स्टुवर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर यांच्यासह अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स संघाबाहेर आहेत. त्यानंतर आता वेगवान गोलंदाज मार्क वुडही (Mark Wood) तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे.
वुडला दुसऱ्या कसोटी दरम्यान दुखापत झाल्यामुळे तो तिसरा कसोटी सामना खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंड संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुनही याबाबतचं ट्विट केलं आहे. वुड याला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु असून अजूनही तो फिट झाला नसल्याने त्याला तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरता येणार नाही.
Wishing you a speedy recovery, @MAWood33! ?
??????? #ENGvIND ??
— England Cricket (@englandcricket) August 23, 2021
डेव्हिड मलान, ऑली पॉप, महमूदला संघात स्थान
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड क्रिकेट संघाने डेव्हिड मलान तसेच ऑली पॉप यांच्यासह गोलंदाज महमूद यालासुद्धा इंग्लंडने संघात स्थान दिलेलं आहे. महमूदने आतापर्यंत कसोटी सामने खेळलेले नाहीत. त्याबरोबरच साकिब हेडिंग्ले याचीसुद्धा संघात वर्णी लागू शकते. डाव्या हाताचा फिरकीपटू जॅक लीचला टीममधून रिलीज करण्यात आले आहे. मात्र, लीच मोईन अलीच्या जागेवर स्टँडबाय म्हणून संघात राहील.
हे ही वाचा
PHOTO : ‘सिराज तू तर जगात भारी’, पाकिस्तानची पत्रकार झाली मोहम्मद सिराजची फॅन
(Mark Wood out of third test against india due to injury)