लॉर्ड्सवर हरले, ‘साहेब’ चिडले, भारताला धूळ चारण्यासाठी 3 वर्षानंतर 2 खेळाडूंना संघात बोलवणं!

इंग्लंडच्या भूमीत ते ही लॉर्ड्सवर पाणी पाजल्याने 'साहेब' प्रचंड चिडलेले आहेत. अशातच आता भारताला धूळ चारण्यासाठी इंग्लंडने 3 वर्षानंतर2 खेळाडूंना संघात बोलवणं धाडलं आहे.

लॉर्ड्सवर हरले, 'साहेब' चिडले, भारताला धूळ चारण्यासाठी 3 वर्षानंतर 2 खेळाडूंना संघात बोलवणं!
इंग्लंडचा कर्णधार जो रुट मार्क वूडसह...
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 9:52 AM

India vs England : ऐतिहासिक लॉर्ड्स ग्राऊंडवर (India vs England Lords Test) भारताने इंग्लंडला धूळ चारली. भारताचा प्रत्येक खेळाडू जिगरबाज पद्धतीने खेळला. एकवेळ भारत पराभूत होतो की काय अशी स्थिती असताना भारतीय खेळाडूंनी दिमाखजार प्रदर्शन करत इंग्लडला आस्मान दाखवलं. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या भूमीत ते ही लॉर्ड्सवर पाणी पाजल्याने ‘साहेब’ प्रचंड चिडलेले आहेत. अशातच आता भारताला धूळ चारण्यासाठी इंग्लंडने 3 वर्षानंतर2 खेळाडूंना संघात बोलवणं धाडलं आहे.

इंग्लंडला दुखापतींचं ग्रहण

दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खांद्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) भारताविरुद्ध तिसरी कसोटी खेळण्याबाबत साशंक आहे. दुखापतीच्या समस्येमुळे इंग्लंड आधीच काही प्रमुख खेळाडूंशिवाय खेळत आहे. स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स दुखापतींमुळे आधीच मालिकेतून बाहेर पडले आहेत. बेन स्टोक्सने मानसिक आरोग्याच्या कारणांमुळे अनिश्चित काळासाठी रजा घेतली आहे. आता वुडचा देखील या यादीत समावेश होऊ शकतो.

वुडला दुखापत, तिसरी खेळण्याबाबत साशंक

तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे सुरु होईल. नॉटिंगहॅममध्ये खेळलेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली. तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा 18 ऑगस्टलाच होणार आहे.

इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी मंगळवारी सांगितले, ‘डॉक्टर वूडच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. पुढील दोन दिवसात परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. त्याच्याशी आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ. जर तो बरा नसेल तर त्याला आम्ही खेळायला भाग पाडणार नाही. आम्ही त्याची काळजी घेऊ.

‘लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना मार्क वुड जखमी झाला होता. तरीही तो सामन्यात खेळत राहिला. पण पाचव्या दिवशी गोलंदाजी केल्यानंतर त्याची दुखापत अधिकच तीव्र झाली, ज्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीतून वगळण्याचा धोका वाढला आहे.

या दोन खेळाडूंना इंग्लंडचं बोलावणं!

खेळाडूंच्या दुखापतीबरोबर टॉप ऑर्डरला सतत येणाऱ्या अपयशामुळे इंग्लंडचं टेन्शन वाढलं आहे. लॉर्ड्स कसोटीत दोन्ही सलामीवीर रोरी बर्न्स आणि डोम सिबली, तसेच तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हसीब हमीद,  एक-एकदा शून्यावर बाद झाले. सिबली बऱ्याच काळापासून सतत फ्लॉप होत आहे. अशा स्थितीत संघ व्यवस्थापन सिबलीला बाहेर बसवू शकतो. बर्न्ससह ओपनिंगमध्ये हमीदला पाठवलं जाऊ शकतं. संघ व्यवस्थापन जेम्स व्हिन्स आणि डेव्हिड मलान यांची निवड करण्याच्या प्रक्रियेत आहे. 2017-18 च्या अॅशेस दौऱ्यात हे दोघेही संघाचा भाग होते. तेव्हापासून ते संघात नाहीयत. या दोघांव्यतिरिक्त, संघाकडे टॉप ऑर्डरमध्ये दुसरा कोणताही पर्याय नाही.

(Mark Wood Shoulder injury dought For third test india vs England test Series)

हे ही वाचा :

IND vs ENG: तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ खेळाडू संघाबाहेर, लॉर्ड्स कसोटीत विजयानंतरही संघात बदलाची शक्यता

IND vs ENG : ‘सामना खेळण्यापेक्षा तो पाहणं अधिक कठीण’, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं व्यक्त केल्या भावना

IND vs ENG : असं काय घडलं? ज्यानंतर भारताने सामना अनिर्णीत न सोडता जिंकायचाच ठरवलं, विराटने दिलं उत्तर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.