धोनीचं प्लॅनिंग, विराटची अंमलबजावणी, T-20 World Cup मध्ये भारत धमाका करणार; दिग्गजाची भविष्यवाणी
टी -20 विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये सज्ज होऊ लागले आहेत. आयपीएल खेळल्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडू तिथे उपस्थित आहेत.
मुंबई : टी -20 विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये सज्ज होऊ लागले आहेत. आयपीएल खेळल्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडू तिथे उपस्थित आहेत. आयपीएल 2021 ची अंतिम फेरी 15 ऑक्टोबरला संपेल, त्यानंतर महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची रणनीती तयार करण्यास सुरुवात करेल. धोनी या स्पर्धेसाठी रणनीती आखण्याचं काम करेल, तर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम विराट कोहली करेल. टी – 20 संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा विश्वचषक आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकण्यासाठी तो शक्य तितके प्रयत्न करेल, यात शंकाच नाही. विश्वचषकाची ही मोहीम पार पाडण्यासाठी धोनी त्याला साथ देईल.कर्णधार म्हणून धोनीने भारताला आयसीसीची तीनही मोठी जेतेपदं जिंकून दिली आहेत. याबाबतीत तो जगात एकमेव कर्णधार आहे. म्हणजेच अनुभवी धोनीचे डोकं आणि विराटचा जोश टी -20 विश्वचषकाच्या खेळपट्ट्यांवर धमाल उडवून देईल. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनीदेखील यावर आपली सहमती दर्शवली आहे. (Mastermind MS Dhoni and Virat Kohli will do wonders for India at the T20 World Cup, says MSK Prasad)
महेंद्रसिंग धोनीला टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा मेंटॉर बनवण्यात आले आहे. एमएसके प्रसाद यांनी बीसीसीआयच्या या निवडीचे कौतुक केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “बीसीसीआय व्यवस्थापन आणि निवड समितीच्या या निर्णयाचे मी कौतुक करतो. हा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय आहे. हा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतला गेला असावा. ज्या खेळाडूला 200 पेक्षा जास्त आयपीएल सामने खेळण्याचा आणि टी 20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव आहे, त्याच्यापेक्षा चांगला खेळाडू मार्गदर्शकाच्या या भूमिकेसाठी कोणीही नाही. या भूमिकेसाठी दुसरा मोठा दावेदार असू शकत नाही. मी या निर्णयाचा आदर करतो आणि याबद्दल खूप आनंदी आहे. टीम इंडियाचा मार्गदर्शक होण्यासाठी धोनीपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही.
धोनीचं ‘डोकं’ आणि विराटचा ‘जोश’
प्रसाद म्हणाले की, “धोनी आणि शास्त्रीसोबत विराटची केमिस्ट्री खूप चांगली आहे. या तिघांसाठी ही एक उत्तम स्पर्धा असणार आहे. विराटने धोनीच्या नेतृत्वाखाली बरेच क्रिकेट खेळले आहे. त्याचबरोबर शास्त्रींबरोबरची त्यांची जुगलबंदी अप्रतिम आहे. एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या वैशिष्ट्यांवर भर दिला आणि म्हणाले, त्याच्याकडील क्रिकेट फील्डवरची अफाट बुद्धीमत्ता, सयंम यामुळे तो नेहमी विरोधी खेळाडूंच्या एक पाऊल पुढे असतो. कोणत्या परिस्थिती काय करायला हवं, याची त्याला अचूक समज आहे. धोनीच्या या गुणांचा विराट कोहलीलादेखील फायदा होईल.
टी -20 विश्वचषकात धोनी टीम इंडियाच्या रणनीती आणि नियोजनाचा एक भाग असेल, यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. नक्कीच, त्याची आणि विराटची जोडी एकत्र धमाल उडवून देईल आणि कदाचित विश्वचष विजयाचा चमत्कारदेखील यावेळी पाहायला मिळू शकतो.
इतर बातम्या
IPL 2021 मधला RCB चा प्रवास संपुष्टात, ग्लेन मॅक्सवेलने शेअर केली मन की बात, ‘त्या’ लोकांना इशारा
IPL 2021: परदेशी गोलंदाजानी तारलं त्यांच्या संघाना, सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत ‘हे’ अव्वल गोलंदाज
(Mastermind MS Dhoni and Virat Kohli will do wonders for India at the T20 World Cup, says MSK Prasad)