18 चेंडूत धमाकेदार इनिंग, Aaron Finch च्या जागी ‘तो’ ऑस्ट्रेलियाच्या T20 टीमचा कॅप्टन होणार?

टेस्ट आणि वनडेमधून त्याने आधीच निवृत्ती घेतली होती. आता टी 20 मधूनही तो निवृत्त झालाय. फिंच निवृत्त झाल्यानंतर त्याच्याजागेचा संभाव्य उत्तराधिकारी धमाकेदार इनिंग खेळला.

18 चेंडूत धमाकेदार इनिंग, Aaron Finch च्या जागी 'तो' ऑस्ट्रेलियाच्या T20 टीमचा कॅप्टन होणार?
cricket Image Credit source: Getty
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 10:40 AM

Aaron Finch Retirement : एरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती जाहीर केलीय. टेस्ट आणि वनडेमधून त्याने आधीच निवृत्ती घेतली होती. आता टी 20 मधूनही तो निवृत्त झालाय. फिंच निवृत्त झाल्यानंतर त्याच्याजागेचा संभाव्य उत्तराधिकारी धमाकेदार इनिंग खेळला. एरॉन फिंचच्या जागी मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाच्या टी 20 टीमचा कॅप्टन बनू शकतो. तो सध्या दक्षिण आफ्रिकेत टी 20 लीगमध्ये खेळतोय. जोहान्सबर्ग सुपर किंग्सकडून 18 चेंडूत तो स्फोटक इनिंग खेळला. परिणामी खराब सुरुवातीनंतरही जोहान्सबर्ग सुपर किंग्सने मोठा विजय मिळवला. वेड ऑस्ट्रेलियच्या टी 20 टीमचा पुढचा कॅप्टन बनू शकतो.

तो 5 व्या नंबरवर बॅटिंगला आला

वेडने मुंबई इंडियन्स केपटाऊन विरुद्धच्या सामन्यात 222 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. तो 5 व्या नंबरवर बॅटिंगला आला होता. जोहान्सबर्ग सुपर किंग्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 189 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबई इंडियन्स केपटाऊन टीमचा 76 धावांनी पराभव झाला.

168 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने रन्स

जोहान्सबर्ग सुपर किंग्सची सुरुवात खूप खराब झाली. त्यांचे दोन्ही इनफॉर्म ओपनर खात न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. अशावेळी डु प्लॉय आणि मॅथ्यू वेडने मिळून धमाकेदार बॅटिंग केली. 28 वर्षाच्या डु प्लॉयने 168 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने रन्स केल्या. 48 चेंडूत नाबाद 81 धावा ठोकल्या. यात 11 चौकार आणि एक षटकार होता.

मॅथ्यू वेड फास्ट खेळला

मॅथ्यू वेड त्यापेक्षा फास्ट खेळला. तो 21 मिनिट क्रीजवर होता. तो फक्त 18 चेंडू खेळला. यात त्याने 222 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. वेडने 40 धावा केल्या. वेडने आक्रमक बॅटिंग केली. त्याने 8 चौकार आणि एक षटकार लगावला.

मुंबईच्या फलंदाजांना जखडून टाकलं

या दोन बॅट्समनच्या बळावर जोहान्सबर्ग सुपर किंग्सने 189 धावा केल्या. मुंबई इंडियन्स या धावसंख्येचा पाठलाग करु शकली नाही. 113 धावाच त्यांनी केल्या. सुपर किंग्सच्या बॉलर्सनी मुंबईच्या फलंदाजांना जखडून टाकलं. सुपर किंग्सकडून सिमंड्स आणि गेराल्डने प्रत्येकी 3-3 विकेट काढल्या. फिंचच्या जागी कॅप्टनशिपसाठी मॅथ्यू वेड योग्य का?

ऑस्ट्रेलियन टीमच्या T20 कॅप्टनशिपसाठी मॅथ्यू वेड मुख्य दावेदार आहे. मॅथ्यू वेडकडे अनुभव आहे. T20 वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियाच नेतृत्व केलय. बॅटने सुद्धा तो फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये त्याची बॅटिंग पाहिल्यानंतर कल्पना येते. फक्त वयच मॅथ्यू वेडच्या कॅप्टनशिपच्या आड येऊ शकतं. मॅथ्यू वेड 35 वर्षांचा आहे. ऑस्ट्रेलियाने दीर्घकाळ कॅप्टनशिपचा विचार केला, तर मॅथ्यू वेडला संधी मिळणार नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.