AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या खेळाडूला प्लेनमध्ये चढण्यापूर्वी वाटू लागलं अस्वस्थ, थेट आयसीयूत करावं लागलं दाखल

टीम इंडियातील खेळाडूची तब्येत अचानक बिघडल्याने एकच धावपळ उडाली. फ्लाईटमध्ये बसण्यापूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने थेट आयसीयूत दाखल करण्याची वेळ आहे. सध्या तब्येत ठीक असून उपचार सुरु आहेत.

टीम इंडियाच्या खेळाडूला प्लेनमध्ये चढण्यापूर्वी वाटू लागलं अस्वस्थ, थेट आयसीयूत करावं लागलं दाखल
टीम इंडियाच्या खेळाडूची प्लेनमध्ये चढण्यापूर्वीच तब्येत झाली खराब, आयसीयूत भरती करण्याची वेळ
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 7:38 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू मयंक अग्रवाल याची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अगरतलावरून फ्लाईट सूरतला जात होती. या प्लेनमध्ये बसण्यापूर्वी मयंक अग्रवाल अस्वस्थ वा़टू लागलं.त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली. मयंक अग्रवालला आयसीयूत भरती करण्यात आलं असून त्याची तब्येत ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे. मयंक अग्रवालकडे कर्नाटक संघाचं नेतृत्व आहे. 32 वर्षीय सलामीवीर मयंक अग्रवाल गेल्या 2 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे.सध्याच्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. मयंकने रणजीतील सुरुवात खराब झाली आणि पंजाबविरुद्धच्या दोन्ही डावात त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर त्याने गुजरात आणि गोव्याविरुद्ध सलग 2 सामन्यात शतके ठोकली.मयंक अग्रवालने 26 ते 29 जानेवारीदरम्यान त्रिपुराविरुद्ध रणजी सामना खेळला होता. यात 51 आणि 17 धावांची खेळी केली होती. हा सामना कर्नाटकने 29 धावांनी जिंकला होता. या सामन्यानंतर मयंकला परत यायचं होतं.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मयंक अग्रवाल याच्यासोबत नेमकं असं का झालं याचा तपास करत आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव शाबीर तारापोर यांनी सांगितलं की, “आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाली असून नेमकं काय घडलं हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे अर्धवट माहिती देण्यात काहीच अर्थ नाही. पण त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे.”

रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकचा पुढचा सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना रेल्वे विरुद्ध होणार आहे. सूरतमध्ये दोन्ही संघात लढत होईर आहे. मात्र मयंकची तब्येत बिघडल्याने पुढील सामना खेळेल की नाही याबाबत आता साशंकता आहे.

मयंक अग्रवालने 5 फेब्रुवारी 2020 रोजी हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. मयंकने भारतासाठी 21 कसोटी, 5 वनडे सामने खेळले आहेत. मयंकने 4 शतकांच्या मदतीने 1488 धावा केल्या. तर एकदिवसीय सामन्यात 86 धावा केल्या.

छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.
फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे 'ती' महिला कोण? मोठी माहिती समोर
फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे 'ती' महिला कोण? मोठी माहिती समोर.
हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अ‍ॅक्शनमोडमध्ये, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त
हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अ‍ॅक्शनमोडमध्ये, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त.
सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य
सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य.
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ.
पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच...
पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच....