नवी दिल्ली : सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान कालचा सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. हैदराबादने दिल्लीला त्यांच्या होमपीचवरच आस्मान दाखवलं. कोणत्याही टीमला त्यांच्या होमपीचवर हरवणं तितकं सोपं नसतं. पण सनराइजर्स हैदराबादने ते करून दाखवलं आहे. म्हणूनच कालचा आयपीएलमधील हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कालच्या सामन्यात हैदराबादची केवळ गोलंदाजीच चालली नाही तर फलंदाजीही चालली. दिल्ली हा सामना जिंकेल असं काही वेळेला वाटून गेलं. पण हैदराबादच्या मयंक मार्कंडेयने अप्रतिम गोलंदाजी करत एका शानदार कॅचने संपूर्ण सामनाच पलटवला. मार्कंडेयच्या एका कॅचने दिल्लीचा करेक्ट कार्यक्रम करत जोरदार विजय मिळवला.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान हा सामना खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने पहिली फलंदाजी केली. 20 षटकात सहा विकेट देत हैदराबादने 197 धावांची खेळी केली. त्याला उत्तर देताना दिल्लीची शेवटी शेवटी दमछाक उडाली. दिल्लीने 20 षटकं खेळत सहा विकेट दिले. पण दिल्लीला 188 धावांच्या पुढे जाता आलं नाही. अवघ्या नऊ धावांनी दिल्लीला पराभूत व्हावं लागलं.
मयंकने या सीझनमध्ये हैदराबादसाठी चांगली कामगिरी केली आहे. मयंक सातत्याने विकेट घेत आहे. कालच्या सामन्यातही त्याने अप्रतिम आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने त्याच्या कोट्यातील चार षटकांमध्ये फक्त 20 धावा दिल्या. सोबत दोन बळीही टिपले. यात त्याने सॉल्टला आऊट केलं. विशेष म्हणजे सॉल्ट काल जोरदार फॉर्मात होता. त्याने धडाकेबाज सुरुवात केली होती.
सॉल्ट असेपर्यंत दिल्ली जिंकणार असंच वाटत होतं. मात्र, मयंकने आपल्या अफलातून फिरकीने सॉल्टचा बळी घेत दिल्लीच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. मयंकाने अफलातून गोलंदाजी करतानाच अप्रतिम क्षेत्ररक्षणही केलं. त्याने सॉल्टची विकेट काढली, हाच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. सॉल्टची विकेट गेल्यानंतर दिल्लीही बॅकफूटवर गेली.
For keeping things tight with the ball and providing breakthroughs at the right time, Mayank Markande becomes our ? performer from the second innings of the #DCvSRH clash in #TATAIPL ????
Take a look at his bowling summary ? pic.twitter.com/93t8niJX1V
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
मयंक 12 वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी मयंकने ऑफ स्टम्प बाहेर चेंडू टाकला. सॉल्टने पाय पुढे टाकत हा चेंडू टोलवला. सॉल्टने थेट शॉट मारला होता. मयंकपासून थोड्या अंतरावर हा चेंडू होता. मयंकनेही डाइव्ह मारून अप्रतिम झेल घेत सॉल्टला तंबूत पाठवलं. त्यामुळे मैदानात घोंघावणारं सॉल्ट नावाचं वादळ थांबलं. फिल सॉल्टने 35 चेंडूत 59 धावा कुटल्या. त्यात नऊ चौकारांचा समावेश आहे. त्याने मिशेल मार्श सोबत 112 धावांची भागिदारी केली. याच सामन्यात मयंकने दिल्ली कॅपिटल्समधून पदार्पण करणाऱ्या प्रियम गर्गचाही बळी घेतला.
मयंक गेल्या सीझनपर्यंत मुंबई इंडियन्ससाठी खेळत होता. मात्र, मुंबई इंडियन्सकडून त्याला फारशी संधी मिळाली नाही. मागच्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सकडून तो अवघे दोन सामने खेळला. या सीझनमध्ये टीमने त्याला रिलीज केलं. त्यानंतर हैदराबादने त्याची निवड केली. हैदराबादकडूनही सुरुवातीच्या सामन्यात त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्यानंतर पंजाब किंग्सच्या विरोधात खेळण्याची त्याला संधी मिळाली. यावेळी त्याने चार विकेट घेऊन सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं.