MI vs CSK IPL 2022: इशान किशन खाली पडला, मुकेश चौधरीच्या जबरदस्त यॉर्करवर विकेट, Watch VIDEO

MI vs CSK IPL 2022: मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आजचा सामना 'करो या मरो' आहे. मुंबई इंडियन्स अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सलग सहा सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.

MI vs CSK IPL 2022: इशान किशन खाली पडला, मुकेश चौधरीच्या जबरदस्त यॉर्करवर विकेट, Watch VIDEO
Ishan kishan Wicket Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 8:22 PM

मुंबई: मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आजचा सामना ‘करो या मरो’ आहे. मुंबई इंडियन्स अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सलग सहा सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. याआधीच्या सीजनमध्येही मुंबई इंडियन्सने खराब सुरुवात केली. पण इतकी खराब सुरुवात त्यांची कधी झाली नसेल. मैदानावर मुंबई इंडियन्सचा विजयासाठी संघर्ष सुरु आहे. आज चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्धही मुंबईची खराब सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याने मुकेश चौधरीच्या (Mukesh Choudhary) गोलंदाजीवर सँटनरकडे सोपा झेल दिला. त्यानंतर त्याच ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर इशान किशन क्लीन बोल्ड झाला. पहिल्या ओव्हरमध्ये मुंबईची स्थिती दोन बाद सहा धावा होती.

क्लासिक यॉर्कर

चेन्नई सुपर किंग्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने आज जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने तीन षटकात 19 धावा देत पहिल्या तीन विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सची टीम सध्या बॅकफूटवर आहे. मुकेशने इशान किशनला ज्या पद्धतीने बाद केले, तो खरोखर अप्रतिम चेंडू होता. क्लासिक यॉर्कर असंच वर्णन करावं लागेल. मुकेशने टाकलेला यॉर्कर इशानला खेळताच आला नाही. इशान हा बॉल खेळताना क्रीझवर खाली पडला. मुकेशने या बॉलवर इशान क्लीन बोल्ड झाला. हा एक अप्रतिम चेंडू होता.

इशान ज्या जबरदस्त यॉर्करवर OUT झाला, तो चेंडू पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कधी खेळणार इशान किशन?

इशान किशन हा यंदाच्या आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू आहे. मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यावर सर्वात मोठी 15.25 कोटी रुपयांची बोली लावून त्याला विकत घेतलं आहे. मुंबईच्या इतिहासात इतके पैसे त्यांनी कधी कुठल्या खेळाडूसाठी मोजले नव्हते. इशान स्पर्धेतला एक महागडा खेळाडू आहे. पण त्याला अजून लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

आज विजय हवाचं

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 81 धावा करुन त्याने चांगली सुरुवात केली होती. पहिले दोन सामने त्याने चांगली फलंदाजी केली. पण नंतर त्याचा सूर हरवला. त्याला कामगिरीत सातत्य ठेवता आलेलं नाही. आजही त्याचा खराब फॉर्म कायम होता. आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी मुंबईला आजचा सामना जिंकण खूप आवश्यक आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यातच इशान किशन भोपळाही न फोडता तंबूत परतला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.