MI vs CSK | 3 मुंबईकर खेळाडू पलटणचा ‘गेम’ करणार, चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पराभव निश्चित?

मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. मुंबईचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. त्याआधी मुंबईसाठी धोक्याची घंटा आहे.

MI vs CSK | 3 मुंबईकर खेळाडू पलटणचा 'गेम' करणार, चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पराभव निश्चित?
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 11:43 AM

मुंबई | आयपीएलमधील 2 यशस्वी असलेले संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 16 व्या हंगामात एकमेकांसमोर पहिल्यांदाच आमनेसामने भिडणार आहे. दोन्ही संघांचा सामना शनिवारी 8 एप्रिल रोजी होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे वानखेडे स्टेडियममध्ये करण्याच आलं आहे. चेन्नईने या हंगामात आतापर्यंत एकूण 2 सामने खेळले आहेत. यापैकी पहिल्या सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवलाय. तर मुंबईचा खेळलेल्या एकमेव सामन्यात पराभव झाला आहे.

त्यामुळे मुंबई चेन्नईचा होम ग्राउंडवर पराभव करत पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र मुंबईला पहिलावहिला विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नसेल. कारण चेन्नईकडून खेळणारे मात्र मुंबईकर असलेले 3 खेळाडू. या तिन्ही खेळाडूंना वानखेडे स्टेडियमबद्दल खडानखडा माहिती आहे.

ऑलराउंडर शिवम दुबे, वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि अनुभवी अजिंक्य रहाणे हे चेन्नईच्या गोटात आहेत. या तिघांना वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत इंत्भूत माहिती आहे. त्यामुळे या तिघांपैकी कुणा एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळो न मिळो, पण इथे मुंबईला धोका निश्चित आहे.

अजिंक्य रहाणे

टीम इंडियाचा स्टार बॅट्समन अजिंक्य रहाणे यंदा चेन्नईच्या ताफ्यात आहे. चेन्नईने अजिंक्यला ऑक्शनमध्ये 50 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं. रहाणेने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचंही प्रतिनिधित्व केलं आहे. रहाणेने 2009 पासून ते 2022 पर्यंत एकूण 158 सामन्यांमध्ये 4 हजार 74 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे.

तुषार देशपांडे

तुषार देशपांडे हा अनकॅप्ड प्लेअर आहे. तुषारला चेन्नईने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइजमध्ये आपल्या गोटात घेतलं. तुषारने चेन्नईकडून या मोसमातील दोन्ही सामन्यात 3 विकेट्स घेतल्या आहेत.

शिवम दुबे

चेन्नईने शिवम दुबेसाठी 4 कोटी रुपये मोजले. शिवमला मुंबईत खेळण्याचा अनुभव आहे. शिवम देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. या मोसमातील 2 सामन्यात शिवमने 46 धावा केल्या आहेत. शिवमने 15 व्या मोसमातील 11 सामन्यात 289 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता हे 3 स्टार खेळाडू वानखेडेवर आपल्या अनुभवाचा वैयक्तिक आणि टीमसाठी कसा फायदा करुन घेतात, याकडे सामन्यादरम्यान सर्वाचं लक्ष राहिल.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

टीम सीएसके | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.