IPL 2021, MI vs CSK Live : दुसऱ्या पर्वात चेन्नईची विजयी सुरुवात, मुंबईचा 20 धावांनी पराभव

| Updated on: Sep 21, 2021 | 5:51 PM

MI vs CSK Live Score: कोरोनाच्या संकटामुळे मध्येच थाबवण्यात आलेल्या आय़पीएलच्या हंगामाला आजपासून पुन्हा सुरु होत आहे. युएईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग यांच्या सामन्याने उर्वरीत आय़पीएलच्या सामन्यांची सुरुवात होणार आहे.

IPL 2021, MI vs CSK Live : दुसऱ्या पर्वात चेन्नईची विजयी सुरुवात, मुंबईचा 20 धावांनी पराभव
CSK Won
Follow us on

कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2021) 14 वे पर्व आजपासून पुन्हा सुरु होत आहे. पहिलीच मॅच आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघादरम्यान खेळविण्यात येत आहे. काही वेळातच सामना सुरु होणार असून नुकतीच नाणेफेक झाली आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय़ घेतला. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ऋतुराजने एकाकी झुंज देत 156 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आता मुंबईला 157 धावांचे आव्हान होते. त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Sep 2021 11:23 PM (IST)

    MI vs CSK : चेन्नई सुपरकिंग्स 20 धावांनी विजयी

    मुंबईच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.

  • 19 Sep 2021 11:19 PM (IST)

    MI vs CSK : राहुल चाहरही बाद! चेन्नईचा विजय जवळपास निश्चित

    चेन्नईने मुंबईचा आठवा गडी राहुल चाहरच्या रुपात तंबूत धाडलं आहे. ब्राव्होच्या चेंडूवर रैनाने त्याचा झेल घेतला आहे.


  • 19 Sep 2021 11:18 PM (IST)

    MI vs CSK : सौरभ तिवारीचं अर्धशतक

    मुंबई इंडियन्सच्या संघाक़डून एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. पण सौरभ तिवारीने मात्र अर्धशतक झळकावलं आहे.

  • 19 Sep 2021 11:16 PM (IST)

    MI vs CSK : मुंबईचा सातवा गडी बाद

    मुंबईचा अॅडम मिलनेचा विकेट ब्रोव्होने घेतला आहे. के गौथमने त्याचा झेल पकडला आहे.

  • 19 Sep 2021 10:47 PM (IST)

    MI vs CSK : मुंबईचा सहावा गडी बाद

    मुंबई इंडियन्सचा सहावा गडी कृणाल पंड्याच्या रुपात बाद झाला आहे. धाव घेताना नॉन स्ट्राईकरवर असणाऱ्या तिवारीसोबत योग्य ताळमेळ न साधता आल्याने कृणालला ब्राव्होच्या मदतीने धोनीने धावचीत केलं आहे.

  • 19 Sep 2021 10:43 PM (IST)

    MI vs CSK : मुंबईची नौका संकटात

    मुंबई इंडियन्सता सर्वात महत्त्वाचा खेळाडू कर्णधार कायरन पोलार्ड बाद झाला आहे. त्यामुळे मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतला असून 14 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोर केवळ 91 धावा इतकाच आहे. हेजलवुडने पोलार्डची विकेट घेतली आहे.

  • 19 Sep 2021 10:20 PM (IST)

    MI vs CSK : इशान किशन तंबूत परत, ब्राव्होला यश

    मुंबईचा आणखी एक गडी बाद झाला आहे. ब्राव्होच्यो चेंडूवर सुरेश रैनाने इशान किशनचा झेल घेत मुंबईला चौथा झटका दिला आहे.

  • 19 Sep 2021 10:03 PM (IST)

    MI vs CSK : सूर्यकुमारही बाद

    मुंबईचा महत्त्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादवही बाद झाला आहे. शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर फाफ डुप्लेसीने त्याचा झेल घेतला.

  • 19 Sep 2021 09:59 PM (IST)

    MI vs CSK : दीपक चाहरचं आणखी एक यश

    दीपक चाहरने चेन्नईला आणखी एक यश मिळवून दिलं आहे. मुंबईकडून डेब्यू करणारा सलामीवीर अनमोलप्रीत सिंग त्रिफळाचीत झाला आहे.

  • 19 Sep 2021 09:46 PM (IST)

    MI vs CSK : मुंबईचा पहिला गडी बाद

    157 धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात करणाऱ्या मुंबईचा सलामीवीर क्विंटन डीकॉक बाद झाला आहे. दीपकने त्याला पायचीत केलं आहे.

  • 19 Sep 2021 09:20 PM (IST)

    MI vs CSK : मुंबईला विजयासाठी 157 धावांची गरज

    अखेरच्या चेंडूवर ऋतुराजने बुमराहला षटकार खेचत चेन्नईच्या स्कोरबोर्डवर 156 धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 157 धावांची गरज आहे.

  • 19 Sep 2021 09:15 PM (IST)

    MI vs CSK : चेन्नईचा सहावा गडीही बाद

    डीजे ब्राव्हो एक धमाकेदार खेळी करुन बाद झाला आहे. बुमराहने त्याचा विकेट घेतला आहे.

  • 19 Sep 2021 09:07 PM (IST)

    MI vs CSK : ऋतुराजचा आणखी एक चौकार

    उत्तम लयीत असलेल्या ऋतुराज गायकवाडने उत्तम स्वीप शॉट खेळत चौकार लगावला आहे.

  • 19 Sep 2021 08:56 PM (IST)

    MI vs CSK : ऋतुराजचं अप्रतिम अर्धशतक

    चेन्नईचे दिग्गज एकामागोमाग एक बाद होत असताना युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने अर्धशतक ठोकत संघाचा डाव सांभाळला आहे. सध्या तो जाडेजासोबत फलंदाजी करत आहे.

  • 19 Sep 2021 08:33 PM (IST)

    MI vs CSK : ऋतुराजचा अप्रतिम षटकार

    दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड क्रिजवर टिकून आहे. नुकताच त्याने कृणालला एक षटकार ठोकला,

  • 19 Sep 2021 08:08 PM (IST)

    MI vs CSK : धोनीही तंबूत परत

    चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीही बाद झाला आहे. अॅडम मिलने याच्या चेंडूवर पुलशॉट मारताना धोनीचा झेल ट्रेन्ट बोल्टने घेतला आहे.

  • 19 Sep 2021 08:05 PM (IST)

    MI vs CSK : ऋतुराजने ठोकला आणखी एक चौकार

    चेन्नईचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर सध्या ऋतुराज गायकवाड आणि एमएस धोनी क्रिजवर आहेत. गायकवाडने नुकताच एक चौकार लगावला आहे.

  • 19 Sep 2021 07:52 PM (IST)

    MI vs CSK : चेन्नईचा तिसरा गडी तंबूत परत

    चेन्नईचे एकामागोमाग एक गडी बाद होत असून सुरेश रैना देखील झेलबाद झाला आहे. बोल्टच्या चेंडूवर राहुल चहरने त्याचा झेल घेतला आहे.

  • 19 Sep 2021 07:49 PM (IST)

    MI vs CSK : रैनाने लगावला सामन्यातील पहिला चौकार

    भारताचा माजी दिग्गज खेळा़डू सुरेश रैनाने अप्रतिम चौकार लगावत खातं खोललं आहे.

  • 19 Sep 2021 07:47 PM (IST)

    MI vs CSK : अंबती रायडूला दुखापत

    दोन गडी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला रायडू दुखापतग्रस्त झाल्याने तो तंबूत परतला आहे. त्याच्या जागी रैना फलंदाजीला आला आहे.

  • 19 Sep 2021 07:41 PM (IST)

    MI vs CSK : मोईन अलीही शून्यावर बाद

    पहिल्या षटकात फाफ डुप्लेसी शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या षटकात मोईन अलीही शून्यावर बाद झाला आहे. अॅडम मिलने याने त्याला बाद केलं आहे. सौरभ तिवारीने उत्तम झेल घेतला आहे.

  • 19 Sep 2021 07:37 PM (IST)

    MI vs CSK : फाफ डुप्लेसी बाद

    पहिल्याच षटकात चेन्नईला मोठा झटका लागला आहे. चेन्नईचा सलामीवीर फाफ डुप्लेसी शून्यावर बाद झाला आहे. ट्रेन्ट बोल्टने त्याला बाद केलं आहे

  • 19 Sep 2021 07:33 PM (IST)

    MI vs CSK: जसप्रीतचं अनोखं शतक

    मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याचा 100 वा आयपीएल सामना खेळत आहे. 2013 मध्ये मुंबई संघातून रिकी पॉन्टिंग कर्णधार असताना बुमराहने डेब्यू केला होता.

  • 19 Sep 2021 07:23 PM (IST)

    MI vs CSK : मुंबईचे दोन प्रमुख खेळाडू Unfit

    मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दीक पंड्या हे अनफिट असल्यामुळे त्यांना विश्रांती देण्यात आली आहे.

  • 19 Sep 2021 07:20 PM (IST)

    MI vs CSK : अशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11

    CSK: एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड

    MI: कायरन पोलार्ड(कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, इशान किशन, अनमोलप्रीत सिंग, क्रुणाल पंड्या, सौरभ तिवारी, एडम मिल्न, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

  • 19 Sep 2021 07:16 PM (IST)

    MI vs CSK : नाणेफेक जिंकत चेन्नईने घेतली फलंदाजी

    बहुप्रतिक्षीत अशा आयपीएलच्या उर्वरीत पर्वाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग हे दिग्गज आमने-सामने आहेत. चेन्नईने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे.