MI vs DC IPL 2022 पॉवेलचा खेळ संपवणारा बुमराहचा परफेक्ट यॉर्कर VIDEO, मुंबईला 160 धावांचं टार्गेट

मुंबईने आजच्या सामन्यात सुरुवात चांगली केली होती. 50 धावात दिल्लीचे आघाडीच चार फलंदाज तंबूत परतले होते. पण पाचव्या विकेटसाठी रोव्हमॅन पॉवेल आणि कॅप्टन ऋषभ पंतने 75 धावांची भागीदारी केली.

MI vs DC IPL 2022 पॉवेलचा खेळ संपवणारा बुमराहचा परफेक्ट यॉर्कर VIDEO, मुंबईला 160 धावांचं टार्गेट
rovman-powellImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 9:36 PM

मुंबई: ‘करो या मरो’ सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 159 धावा केल्या आहेत. Mumbai Indians ला विजयासाठी 160 धावांची आवश्यकता आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात विजय मिळवला, तर त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे उघडतील. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने बाजी मारली, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) टीम प्लेऑफमध्ये पोहोचेल. मुंबई इंडियन्सच्या लेखी प्रतिष्ठा राखण्यासाठी विजय मिळवणं एवढच या सामन्याचं महत्त्व आहे. पण दिल्ली आणि आरसीबीसाठी असं नाहीय. मुंबईने आज जिंकाव, अशी तमाम आरसीबीच्या चाहत्यांची इच्छा असेल.

आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रोव्हमॅन पॉवेलचा बुमराहने परफेक्ट यॉर्करवर असा संपवला खेळ, इथे क्लिक करुन पहा

पॉवेल-पंतने सावरला डाव

मुंबईने आजच्या सामन्यात सुरुवात चांगली केली होती. 50 धावात दिल्लीचे आघाडीच चार फलंदाज तंबूत परतले होते. पण पाचव्या विकेटसाठी रोव्हमॅन पॉवेल आणि कॅप्टन ऋषभ पंतने 75 धावांची भागीदारी केली. पॉवेल आणि पंतने दिल्लीचा डाव सावरला. रोव्हमॅन पॉवेलने 34 चेंडूत 43 धावांची खेळी केली. यात एक चौकार आणि चार षटकार आहेत. ऋषभने 33 चेंडूत 39 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार आहे. अखेरीस अक्षर पटेलने थोडीफार फटकेबाजी केली. त्यामुळे दिल्लीला लढण्याइतपत टार्गेट मुंबईला देता आले.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

बुमराहची सुंदर गोलंदाजी

आक्रमक सलमीवीर डेविड वॉर्नरला अवघ्या 5 रन्सवर डॅनियल सॅम्सने जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केलं. त्यानंतर मागच्या काही सामन्यात दमदार खेळ करणारा मिचेल मार्शला आज भोपळाही फोडता आला नाही. जसप्रीत बुमराहने त्याला कॅप्टन रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. रोहितने स्लीपमध्ये खूपच अप्रतिम झेल घेतला. रोहितकडून खूप दिवसांनी स्लीपमध्ये इतकं अप्रतिम क्षेत्ररक्षण पहायला मिळालं. पृथ्वी शॉ चांगली फलंदाजी करत होता. पण त्याला जसप्रीत बुमराहने बाऊन्सवर आऊट केलं. बुमराहने टाकलेला बाऊन्सर इतका जबरदस्त होता की, पृथ्वी शॉ ला तो खेळताच आला नाही. पृथ्वी हा बाऊन्सर फेस करताना, खाली पडला. चेंडू त्याच्या बॅटच्या दांड्याला लागून मागे गेला. विकेटकीपर इशान किशनने डाइव्ह मारुन झेल घेतला. पृथ्वीने 24 धावा केल्या.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.