MI vs KKR IPL 2022: अरे, हे काय, कायरन पोलार्डने अंपायरच्या पोटात बॉल मारला, Must Watch VIDEO

MI vs KKR IPL 2022: आज पोलार्ड गोलंदाजी करत असताना त्याने टाकलेला चेंडू मैदानावरच्या अंपायपरला लागला. तुम्ही म्हणालं गोलंदाजी करताना पोलार्ड अंपायरला कसा बॉल मारेल. तो तर क्रीझच्या मागे उभा असतो.

MI vs KKR IPL 2022: अरे, हे काय, कायरन पोलार्डने अंपायरच्या पोटात बॉल मारला, Must Watch VIDEO
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 9:18 PM

मुंबई: कायरन पोलार्ड (Kieron Pollard) एक मनोरंजक व्यक्तीमत्व आहे. तो क्रीझवर असताना प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन होतं. फलंदाजी करत असेल, तर आपल्या फटक्यांनी, फिल्डिंग करताना आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने तो प्रेक्षकांच मनोरंजन करतो. आयपीएलच्या या सीजनमध्ये कायरन पोलार्डने अजून म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही. तो फ्लॉपच ठरलाय. कदाचित तो पुढच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना सुद्धा दिसणार नाही. कायरन पोलार्डमध्ये आता ती आक्रमकता राहिलेली नाहीय, असं बोललं जातय. पण पोलार्ड खेळपट्टीवर असताना अनेकदा आपल्या कृतीतून मनोरंजन करतो. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) असा सामना सुरु आहे. पोलार्ड गोलंदाजी करत असताना, अशीच एक गमतीशीर घटना आज मैदानात घडली. पोलार्डला स्वत:ला सुद्धा हसू आलं आणि प्रेक्षकांच सुद्धा मनोरंजन झालं. पोलार्ड कधी स्वत:हून असे गमतीशीर किस्से करतो, तर कधी अपघाताने घडतात.

पोलार्ड अंपायरला कसा बॉल मारेल?

आज पोलार्ड गोलंदाजी करत असताना त्याने टाकलेला चेंडू मैदानावरच्या अंपायपरला लागला. तुम्ही म्हणालं गोलंदाजी करताना पोलार्ड अंपायरला कसा बॉल मारेल. तो तर क्रीझच्या मागे उभा असतो.

10 व्या षटकात ही घटना घडली

केकेआरच्या डावात 10 व्या षटकात ही घटना घडली. पोलार्ड पाचवा चेंडू टाकत असताना अपघाताने त्याचा चेंडू मैदानावरील अंपायर ख्रिस गॅफनी यांना लागला. पाचवा चेंडू टाकताना पोलार्डच्या ग्रीपमधून चेंडू निसटला व बॉल मागे उभ्या असलेल्या अंपायरच्या पोटात लागला. अशा पद्धतीने चेंडू लागेल याची पंचांनी सुद्धा कल्पना केली नव्हती. काही क्षणासाठी पंच ख्रिस कळवळले. पोलार्डने त्यांची माफी मागितल्यानंतर ते सुद्धा स्वत: हसत होते. आयपीएलचा सीजन आता संपत आला. कायरन पोलार्ड आपला जुना करिष्मा दाखवेल, अशीच प्रेक्षकांना अपेक्षा आहे. कायरन पोलार्ड मुंबईचा मॅचविनर खेळाडू आहे. पण यंदाच्या सीजनमध्ये काही सामने हातात असतानाही, पोलार्डला जिंकवून देता आलेले नाहीत. त्यामुळे पोलार्डच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. आता सीजन संपताना तरी पोलार्ड निदान आपला जलवा दाखवेल अशी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.