MI vs KKR IPL 2022: वेंकटेश अय्यरची जबरदस्त फलंदाजी, पावरप्लेमध्ये KKR ची दमदार सुरुवात
MI vs KKR IPL 2022: मुंबई इंडियन्सची टीम आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. आता प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि मोसमाचा शेवट चांगला करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (MI vs KKR) सामना सुरु आहे. इंडियन प्रीमियर लीगमधला हा 56 वा सामना आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या गोलंदाजांना कॅप्टनचा हा निर्णय सार्थ ठरवता आला नाही. पावरप्लेच्या सहा षटकात केकेआरच्या एक बाद 64 धावा झाल्या आहे. सलामीवीर वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) आज आक्रमक सुरुवात केली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. बाद होण्याआधी त्याने 24 चेंडूत 43 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 4 सिक्स होते. कुमार कार्तिकेयच्या गोलंदाजीवर त्याने सॅम्सकडे सोपा झेल दिला. पण त्याआधी वेंकटेशन आपलं काम चोख बजावलं.
KKR साठी प्लेऑफच गणित कसं आहे?
मुंबई इंडियन्सची टीम आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. आता प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि मोसमाचा शेवट चांगला करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याचवेळी केकेआरचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. पण त्यांना प्रत्येक मॅच जिंकावी लागेल. त्याशिवाय दुसऱ्या टीम्सच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल. कोलकाताची टीम 11 सामन्यात 10 पॉइंटससह 9 व्या स्थानावर आहे.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, तिलक वर्मा, रमनदीप सिंह, टिम डेविड, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंह आणि रायली मेरेडिथ
कोलकाता नाइट रायडर्स – श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नीतीश राणा, रिंकू सिंह, आंद्र रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स, टिम साउदी आणि वरुण चक्रवर्ती,