MI vs KKR IPL 2023 Highlights | मुंबई इंडियन्सचा केकेआरवर 5 विकेट्सने शानदार विजय

| Updated on: Apr 16, 2023 | 7:56 PM

MI vs KKR IPL 2023 Highlights In Marathi | मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स टीमवर 5 विकेट्सने वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवला आहे.

MI vs KKR IPL 2023 Highlights | मुंबई इंडियन्सचा केकेआरवर 5 विकेट्सने शानदार विजय

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील 22 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.  कोलकाताने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं आहे.  मुंबईचा हा या मोसमातील सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. तसेच मुंबईची कोलकातावर आतापर्यंत विजय मिळवण्याची ही 33 सामन्यांपैकी 23 वी वेळ ठरली. तसेच मुंबई इंडियन्सचा हा घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवरील पहिला विजय ठरला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 16 Apr 2023 07:54 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | पलटणचा मोसमातील सलग दुसरा विजय

    मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 5 विकेट्सने पराभूत करत मोसमातील सलग दुसरा विजय साजरा केला आहे. केकेआरने मुंबईला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी केलेल्या तडाखेदार खेळीच्या जोरावर 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

  • 16 Apr 2023 06:55 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | मुंबईला तिसरा धक्का

    सुयश शर्मा या फिरकी गोलंदाजाने मुंबईची सेट झालेली सूर्यकुमार यादव आणि टिळक वर्मा ही जोडी फोडली आहे. सुयशने टिळक वर्मा याला बोल्ड केलं. सुयशने 25 बॉलमध्ये 30 धावा केल्या.

  • 16 Apr 2023 06:22 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | तुफानी अर्धशतकानंतर इशान किशन आऊट

    वादळी अर्धशतक ठोकल्यानंतर इशान किशन आऊट झाला आहे.  इशानने सुरुवातीपासून तुफानी बॅटिंग केली.  इशानने 25 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली.

  • 16 Apr 2023 06:10 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | मुंबईला चांगल्या सुरुवातीनंतर पहिला धक्का

    मुंबई इंडियन्सने आक्रमक सुरुवात केली. इशान किशन आणि इमपॅक्ट प्लेअर रोहित शर्मा या जोडीने 65 धावांची सलामी भागीदारी केली.  मात्र त्यानंतर 5 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मुंबईला पहिला झटका लागला. सुयश शर्मा या युवा गोलंदाजाने आपल्या बॉलिंगवर रोहित शर्मा याला आऊट केलं. उमेश यादव याने डाईव्ह घेत अप्रतिम कॅच घेतला.

  • 16 Apr 2023 06:06 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | रोहित-इशान शानदार भागीदारी

    रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामी जोडीसाठी टॉप गिअर टाकत पावर प्लेच्या ओव्हरमध्ये अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 16 Apr 2023 05:48 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात

    मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. केकेआरने मुंबईला विजयासाठी 186 धावांचं आव्हान मिळालं आहे. मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रोहित शर्मा हा बॅटिंगसाठी आला आहे. तर त्याच्यासोबत इशान किशन आहे.

  • 16 Apr 2023 05:35 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | मुंबईला विजयासाठी 186 धावांचं आव्हान

    कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. केकेआरकडून वेंकटेश अय्यर याने 104 धावांची शतकी खेळी केली. वेंकटेशशिवाय इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. केकेआरकडून रहमुल्लाह गुरबाज याने 8, कॅप्टन नितीश राणा याने 5, शार्दुल ठाकूर 13, रिंकू सिंह 18, आंद्रे रसेल 21* आणि सुनील नारायण याने 2* धावांची खेळी केली. तर मुंबई इंडियन्सकडून हृतिक शौकीन याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. कॅमरुन ग्रीन, दुआन जान्सेन, पियूष चावला आणि रिले मेरेडिथ या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

    वेंकटेश अय्यरचं याचं खणखणीत शतक

  • 16 Apr 2023 05:09 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | शतकी खेळीनंतर वेंकटेश अय्यर आऊट

    शानदार शतक ठोकल्यानंत वेंकटेश अय्यर आऊट झाला आहे. वेंकटेशने 51 बॉलमध्ये 104 धावांची शतकी खेळी केली.

  • 16 Apr 2023 04:46 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | शार्दुल ठाकूर आऊट

    कोलकाताने चौथी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकूर याला हृतिक शौकीन याने 13 धावांवर टिळक वर्माच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 16 Apr 2023 04:44 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | अय्यरचा दे दणादण, कोलकाता मजबूत स्थितीत, मुंबई बॅकफुटवर

    कोलकाता 12 ओव्हरनंतर मजबूत स्थितीत पोहचली आहे. वेंकटेश अय्यर याच्या फटकेबाजीमुेळ मुंबई इंडियन्स बॅकफुटवर गेली आहे. शार्दुल ठाकूर आणि वेंकटेश अय्यर जोडी मैदानात खेळत आहे.

  • 16 Apr 2023 04:22 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | कोलकाताला मोठा धक्का, कॅप्टन नितीश राणा बाद

    ऋतिक शौकीन याने कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा झटका दिला आहे. ऋतिकने केकेआर कॅप्टन नितीश राणा याला आऊट केलं आहे. नितीशने  5 धावा केल्या.

  • 16 Apr 2023 04:10 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | रहमानुल्लाह गुरुबाज आऊट

    कोलकाताला दुसरा झटका लागला आहे. मुंबई इंडियन्सच्या अनुभवी  फिरकीपटू पियूष चावला याने गुगली बॉलवर  रहमानुल्लाह गुरुबाज याला दुआन जान्सेन याच्या हाती कॅचआऊट केलं.

  • 16 Apr 2023 03:53 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | एन जगदीशन आऊट, कोलकाताची पहिली विकेट

    कोलकाता नाईट रायडर्सने पहिली विकेट गमावली आहे. एन जगदीशन आऊट झाला आहे.

  • 16 Apr 2023 03:33 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | पहिली ओव्हर अर्जुन तेंडुलकर याला

    मुंबईकडून पदार्पणपणीवर अर्जुन तेंडुलकर हा पहिली ओव्हर टाकत आहे. केकेआरकडून रहमानुल्लाह गुरुबाज आणि एन जगदीशन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 16 Apr 2023 03:31 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | केकेआरच्या बॅटिंगला सुरुवात

    कोलकाता नाईट रायडर्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. केकेआरकडून रहमानुल्लाह गुरुबाज आणि एन जगदीशन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 16 Apr 2023 03:28 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन |

    कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.

  • 16 Apr 2023 03:27 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.

  • 16 Apr 2023 03:02 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | मुंबईने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून कोलकाताला  बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता केकेआर मुंबईला घरच्या मैदानात विजयासाठी किती आव्हान देतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 16 Apr 2023 03:00 PM (IST)

    MI vs KKR IPL 2023 Live Score | मुंबई विरुद्ध कोलकाता हेड टु हेड रेकॉर्ड

    आयपीएलच्या 16 व्या मोसमात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे.  आतापर्यंत हे दोन्ही संघ एकूण 32 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. मुंबईने केकेआरला तब्बल 22 वेळा पराभूत केलंय.  तर कोलकाताने मुंबईवर 9 वेळा विजय मिळवला आहे.  मात्र गेल्या 3 सामन्यांमध्ये केकेआर मुंबईवर वरचढ राहिली आहे. केकेआरने मुंबईवर गेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात आता काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांंचं लक्ष असणार आहे.

Published On - Apr 16,2023 2:56 PM

Follow us
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.