IPL 2021: आधी गोलंदाजांनी जखडलं, मग अय्यर-त्रिपाठीने फोडलं, KKR चा मुंबईवर 7 विकेट्सनी विजय

पहिल्या पर्वात खास कामगिरी करु न शकलेल्या केकेआरने उर्वरीत पर्वाची सुरुवात अप्रतिम केली आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबीला नमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात बलाढ्य मुंबईलाही 7 विकेट्सने पराभूत केलं आहे.

IPL 2021: आधी गोलंदाजांनी जखडलं, मग अय्यर-त्रिपाठीने फोडलं, KKR चा मुंबईवर 7 विकेट्सनी विजय
राहुल त्रिपाठी
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 11:06 PM

IPL 2021: आयपीएलच्या उर्वरीत पर्वाची धमाकेदार सुरुवात करत केकेआरने (KKR) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. तर पहिल्याच सामन्यात धोनीच्या चेन्नईकडून पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सला (MI) अजून एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. केकेआरने मुंबईवर 7 विकेट्सने अप्रतिम विजय मिळवला आहे. या विजयात युवा फलंदाज व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांची अर्धशतकं महत्त्वाची ठरली. दोघांनी धडाकेबाज फलंदाजी करत केकेआरला सोपा विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर मुंबईकडून सलामीवीर रोहित आणि डिकॉकने उत्तम सुरुवात केली. पण रोहित बाद होताच नंतरच्या फलंदाजाना खास कामगिरी करता आली नाही. केवळ डिकॉकने (55) अर्धशतक झळकावल्यामुळे मुंबई 155 धावांपर्यंत मजल मारु शकली. ज्यामुळे 156 धावांच सोपं टार्गेट केकेआरला मिळालं.

अय्यर-त्रिपाठीकडून धडाकेबाज अर्धशतकं

फलंदाजीला केकेआरचा संघ येताच सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी फटेबाजी करण्यासच सुरुवात केली.बुमराहने ही भागिदारी तोडत केकेआर 40 धावांवर असताना शुभमनला 13 धावांवर बाद केलं. पण त्यानंतर केकेआरकडून यंदा खेळणारा युवा खेळाडू व्यंकटेश अय्यरने धुरंधर खेळीचं प्रदर्शन दाखवलं. त्याने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक ठोकलं. संपूर्ण खेळीचा विचार करता त्याने 30 चेंडूत 53 धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. अय्यरसोबतच दुसरा युवा खेळाडू राहुल त्रिपाठीने देखील 29 चेंडूत अर्धशतकं ठोकलं. त्याने 42 चेंडूत 74 धावा केल्या. या खेळीत राहुलने 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने 7 गडी राखून विजय मिळवला.

रोहित शर्माचा अनोखा विक्रम

मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात पराभाव पत्करावा लागला असला तरी त्यांचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मात्र एक धाकड विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. रोहितने केकेआरविरुद्ध 30 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. त्याने क्विंटन डिकॉकसोबत  चांगली सुरुवात केली पण जादुई फिरकीपटू सुनील नारायणच्या (Sunil Narayan) चेंडूवर शर्मा झेलबाद झाला. सीमारेषेवर शुभमन गिलने त्याचा झेल घेतला. पण बाद होण्यापूर्वीच रोहितने एक मोठा रेकॉर्ड स्वत:च्या नावे केला आहे. त्याने केकेआर संघाविरुद्ध 1000 धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध 1000 धावा करणारा रोहित पहिलाच खेळाडू ठरला आहे.

हे ही वाचा

MI vs KKR: हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलमध्येही ‘हिट’, कोणालाही न जमलेला रेकॉर्ड केला नावावर

T20 World Cup चे Theme Song तयार, विराट-पोलार्डसह राशिद-मॅक्सवेल नव्या अवतारात, पाहा VIDEO

IPL 2021 : वैयक्तिक आयुष्यात धक्के, पण बॅट मात्र तळपतीच, प्रत्येक हंगामात शिखरकडून रन्सचा पाऊस, प्रतिस्पर्ध्यांना धसका!

(MI vs KKR Live match Kolkata knight riders won game with 7 wickets mumbai indians lost the match)

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.