मुंबई इंडियन्सचं आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. जर तरच्या गणितातूनही मुंबई इंडियन्स संघ बाहेर गेला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला 24 धावांनी पराभूत केलं. मुंबई इंडियन्सला विजयासाठी दिलेल्या 170 धावांचं आव्हानही गाठता आलं नाही. मुंबईचा संघ 146 धावा करू शकला. यामुळे मुंबईला तळाशी राहावं लागलं आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. कारण उर्वरित तीन सामने जिंकले तरी 12 गुण होतील. या समीकरणासह प्लेऑफ गाठणं शक्यच नाही.