MI vs LSG : लखनऊ विरुद्ध जिंकायच असेल, तर टिम डेविड, कॅमरुन ग्रीनने रिंकू सिंहकडून काय शिकलं पाहिजे?

MI vs LSG IPL 2023 Eliminator : पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांसमोर यश ठाकूर असणार. रिंकू सिंह यशची गोलंदाजी कशी खेळला होता? आणि तेच टिम डेविड-कॅमरुन ग्रीन कसे खेळलेले? यातून फरक दिसून येतो.

MI vs LSG : लखनऊ विरुद्ध जिंकायच असेल, तर टिम डेविड, कॅमरुन ग्रीनने रिंकू सिंहकडून काय शिकलं पाहिजे?
IPL 2023 MI
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 10:33 AM

चेन्नई : IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये खेळणारे चार संघ कुठले? ते निश्चित झालय. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या चार टीम्स प्लेऑफमध्ये आहेत. आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये क्वालिफायर 1 चा सामना होईल. त्यानंतर उद्या म्हणजे बुधवारी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये एलिमिनेटरचा सामना होणार आहे. मुंबई आणि लखनऊ सामन्यामध्ये जो हरेल, त्यांचं टुर्नामेंटमधील आव्हान संपुष्टात येईल.

जिंकणाऱ्या टीमला क्वालिफायर 1 मधील पराभूत संघाशी खेळाव लागेल. त्यानंतर फायनल खेळणारी दुसरी टीम कुठली? ते निश्चित होईल. मुंबई इंडियन्स सहजासहजी प्लेऑफमध्ये पोहोचलेली नाही. त्यांची चांगलीच दमछाक झाली. दुसऱ्या टीम्सच्या निकालावर अवलंबून रहाव लागलं.

लखनऊ विरुद्ध लास्ट 2 ओव्हर्समध्ये चूका

मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये खेळताना मागच्या चुका टाळाव्या लागतील. कारण आता पुन्हा संधी नाहीय. साखळी फेरीत लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला अवध्या 5 धावांनी पराभूत केलं होतं. मुंबईने ही मॅच जिंकली असती, तर आज मुंबई क्वालिफायरच्या सामन्यात खेळताना दिसली असती. लीग स्टेजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये चुका केल्या होत्या. त्यामुळे मुंबईला लखनऊ विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

लखनऊचे दोन बॉलर्स धोकादायक

लखनऊने विजयासाठी 177 धावांच आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्सने 172 धावा केल्या. लखनऊकडून लास्ट ओव्हर टाकणारा मोहसीन खान हिरो ठरला होता. मुंबईसाठी कॅमरुन ग्रीन विलन ठरला होता. लखनऊकडून यश ठाकूर आणि मोहसीन खानने लास्टच्या 2 ओव्हर टाकल्या. त्यांनी लखनऊच्या विजयाचा अध्याय लिहिला होता.

रिंकू सिंहकडून काय शिकलं पाहिजे?

मुंबईकडून टिम डेविड आणि कॅमरु ग्रीनची जोडी मैदानात होती. दोघेही बिग हिटर असल्यामुळे मुंबई सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण यश ठाकूर आणि मोहसीन खानने या दोन्ही आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलं. त्यामुळे मुंबई जिंकली नाही. हेच केकेआर विरुद्ध लखनऊने अवघ्या 1 रन्सने विजय मिळवला. रिंकू सिंहने या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. रिंकूला फक्त फिनिशिंग टच देता आला नाही. पण त्याने लखनऊला चांगलच टेन्शनमध्ये आणलेलं.

यश ठाकूर मुंबईसाठी सर्वात धोकादायक

या मॅचमध्ये यश ठाकूरची गोलंदाजी रिंकू ज्या पद्धतीने खेळला, ते टिम डेविड आणि कॅमरुन ग्रीनने पाहिलं पाहिजे. मुंबई विरुद्ध्चा सामन्यात यश ठाकूर यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होता. त्यात तो यशस्वी सुद्धा ठरला. चेंडू बॅट्समनला टप्प्यात मिळणार नाही, याची त्याने खबरदारी घेतली. त्याने चेंडू खाली ठेवले, फुलटॉस जाणार नाही, हे पाहिलं. टिम डेविड नुसती बॅट फिरवत होता. त्याने लखनऊ विरुद्ध 19 चेंडूत 32 धावा केल्या. पण त्याने यशच्या बॉलिंवर एकेरी धावा पळून काढल्या असत्या, तर कदाचित लखनऊची टीम प्लेऑफमध्ये नसती. रिंकू अपवाद ठरला

रिंकूला सुद्धा यश ठाकूरने तशीच गोलंदाजी केली. रिंकूने त्याच्या अशाच बॉल्सवर फ्रंट फूटवर येऊन ड्राइव्ह मारले. एकेरी-दुहेरी धावा पळून काढल्या. आता एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांना यशची गोलंदाजी खेळताना हीच काळजी घ्यावी लागेल.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.