IPL 2022: Mumbai Indians च्या बेबी एबीचा धमाका, चार बॉल, चार सिक्स, राहुल चाहर धुलाई नाही विसरणार, पहा VIDEO
Mumbai Indians IPL 2022: आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी डेवाल्ड ब्रेविसची बरीच चर्चा होती. हा डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिविलियर्स सारखा खेळतो.
मुंबई: आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी डेवाल्ड ब्रेविसची बरीच चर्चा होती. हा डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिविलियर्स सारखा खेळतो. म्हणून त्याला बेबी एबी म्हणतात. अंडर 19 वर्ल्डकपमध्येही या बेबी एबीने आपली चुणूक दाखवली होती. त्यामुळे फेब्रुवारीत झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तीन कोटी रुपये मोजून बेबी एबीला विकत घेतलं होतं. या बेबी एबीने आज आपला धमाका दाखवला. पंजाब किंग्स विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात त्याने राहुल चाहरची (Rahul chahar) फिरकी गोलंदाजी फोडून काढली. चाहरच्या एक ओव्हरमध्ये त्याने 29 धावा लुटल्या. चार चेंडूंवर सलग चार षटकार ठोकले. राहुल चाहरने मॅचआधी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसाठी विशेष प्लानिंग केल्याचं म्हटलं होतं. आज बेबी एबीने त्याची सगळी योजनाच धुळीस मिळवली. कदाचित राहुल चाहर बेबी एबीने त्याला आज ज्या पद्धतीने धुतलं, ते कधी विसरणार नाही. फटकेबाजी करताना बेबी एबी ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर 49 रन्सवर आऊट झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि पाच षटकार लगावले.
पहिल्याच सामन्यात दाखवली होती झलक
ज्यूनियर एबी डिविलियर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसने काल कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये डेब्यू केला. डेब्यू मॅचमध्ये डेवाल्ड ब्रेविसने आपली छाप उमटवली. तो मुंबई इंडियन्सकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. डेवाल्ड ब्रेविसने पदार्पणाच्या सामन्यात 19 चेंडूत 29 धावा केल्या. ब्रेविसने त्याच्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत डेवाल्डने ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं होतं. ब्रेविसने सहा सामन्यात 84.33 च्या सरासरीने 506 धावा केल्या. त्याने दोन शतकं आणि तीन अर्धशतक झळकावली.
ते चार SIX पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ब्रेविसचे आकडे काय सांगतात?
डेवाल्ड ब्रेविसने आतापर्यंत नऊ टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 25.87 च्या सरासरीने 207 धावा केल्या आहेत. ब्रेविसचा स्ट्राइक रेट 125 पेक्षा जास्त आहे. त्याने आतापर्यंत नऊ षटकार आणि 18 चौकार लगावले आहेत. डेवाल्ड ब्रेविसचे हे आकडे तुम्हाला कदाचित खास वाटणार नाहीत. पण तुम्ही त्याच्या अंडर 19 मधील कामगिरीवर नजर मारा. ब्रेविस या स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू होता. ब्रेविसने 84 च्या सरासरीने 506 धावा केल्या. ब्रेविसने वर्ल्ड कप मध्ये दोन शतक आणि तीन अर्धशतक झळकावली आहेत.