MI vs PBKS, Live Score, IPL 2022: मुंबई इंडियन्स पुन्हा हरली, सलग पाचवा पराभव

| Updated on: Apr 14, 2022 | 12:13 AM

Mumbai Indians vs Punjab kings Live score in Marathi: पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत एकदाही जिंकलेला नाही

MI vs PBKS, Live Score, IPL 2022: मुंबई इंडियन्स पुन्हा हरली, सलग पाचवा पराभव
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधला सर्वात यशस्वी संघ आहे. या टीमने आतापर्यंत तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. अशी कामगिरी अजून दुसऱ्या कुठल्याही संघाला करता आलेली नाही. पण यंदाच्या सीजनमधला मुंबईचा खेळ पाहिला की, हाच तो संघ का? असा प्रश्न पडतो. एकापाठोपाठ एक मुंबई इंडियन्सला पाच पराभवांना सामोर जावं लागलं आहे. आज पंजाब किंग्सने (Punjab kings) मुंबई इंडियन्सला 12 धावांनी नमवलं. मुंबईला विजयासाठी 199 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण मुंबई इंडियन्सला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 186 धावांच करता आल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 13 Apr 2022 11:30 PM (IST)

    मुंबई इंडियन्स पुन्हा हरली, सलग पाचवा पराभव

    मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा पराभव झाला आहे. पंजाब किंग्सने हा सामना 12 धावांनी जिंकला. पंजाबने विजयासाठी 199 धावांच लक्ष्य दिलं होतं. मुंबई इंडियन्सने निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये नऊ बाद 186 धावा केल्या.

  • 13 Apr 2022 11:20 PM (IST)

    मुंबई इंडियन्सची विजयाची आशा संपली? सूर्यकुमार OUT

    मुंबई इंडियन्सचा भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. 9 चेंडूत 22 धावांची गरज असताना रबाडाच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना सूर्यकुमार 43 धावांवर आऊट झाला.

  • 13 Apr 2022 11:08 PM (IST)

    सूर्यकुमारने मारल्या दोन सिक्स

    वैभव अरोराने 17 व षटक टाकलं. सूर्यकुमारने यादवने या ओव्हरमध्ये 2 सिक्स मारल्या. मुंबईच्या पाच बाद 166 धावा झाल्या आहेत.

  • 13 Apr 2022 11:06 PM (IST)

    मुंबई इंडियन्सला मोठा झटका

    मुंबई इंडियन्सला मोठा झटका. कायरन पोलार्ड Runout झाला. ओडियन स्मिथने केलेल्या थ्रो वर रनआऊट झाला. पोलार्डने 10 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या पाच बाद 159 धावा झाल्या आहेत.

  • 13 Apr 2022 10:52 PM (IST)

    मुंबईला विजयासाठी 36 चेंडूत 61 धावांची आवश्यकता

    14 षटकात मुंबई इंडियन्सच्या चार बाद 138 धावा झाल्या आहेत. मुंबईला विजयासाठी 36 चेंडूत 61 धावांची आवश्यकता आहे. सूर्यकुमार यादव आणि पोलार्ड मैदानात आहे.

  • 13 Apr 2022 10:32 PM (IST)

    डेवाल्ड ब्रेविस आऊट

    जबरदस्त फलंदाजी करणारा डेवाल्ड ब्रेविस 49 धावांवर आऊट झाला. मुंबई इंडियन्सच्या 11 ओव्हरमध्ये तीन बाद 116 धावा झाल्या आहेत.

  • 13 Apr 2022 10:20 PM (IST)

    बेबी एबीने राहुल चाहरलं धुतलं, एका ओव्हरमध्ये 29 धावा लुटल्या

    फिरकी गोलंदाज राहुल चाहरची गोलंदाजी डेवाल्ड ब्रेविसने फोडून काढली. सलग चार चेंडूंवर चार षटकार ठोकले. मुंबई इंडियन्सच्या नऊ षटकात दोन बाद 92 धावा झाल्या आहेत. राहुलच्या एक ओव्हरमध्ये 29 धावा लुटल्या.

  • 13 Apr 2022 09:57 PM (IST)

    रोहित शर्मा पाठोपाठ इशान किशन OUT

    रोहित शर्मा पाठोपाठ इशान किशन OUT झाला. वैभव अरोराने त्याला विकेटकीपर शर्माकरवी झेलबाद केलं. इशानने फक्त 3 रन्स केल्या. दोन बाद 32 अशी मुंबईची स्थिती आहे.

  • 13 Apr 2022 09:55 PM (IST)

    मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा OUT

    कागिसो रबाडाला षटकार मारल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा 28 धावांवर आऊट झाला. रोहितने 17 चेंडूत 28 धावा फटकावताना तीन चौकार, दोन षटकार लगावले. रबाडाच्या गोलंदाजीवर वैभव अरोराकडे त्याने झेल दिला. मुंबईच्या एक बाद 31 धावा झाल्या आहेत.

  • 13 Apr 2022 09:50 PM (IST)

    मुंबईच्या डावाला सुरुवात

    मुंबईच्या डावाला सुरुवात झाली आहे. तीन षटकात मुंबईच्या बिनबाद 25 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 22 आणि इशान किशन 3 धावांवर खेळतोय.

  • 13 Apr 2022 09:24 PM (IST)

    मुंबईला विजय मिळणार?

    पंजाब किंग्सने आज दमदार फलंदाजी केली. मुंबई इंडियन्सला विजयासाठी 199 धावांचे लक्ष्य दिले आहे. पंजाबकडून कॅप्टन मयंक अग्रवालने 52, शिखर धवनने 70 आणि जितेश शर्माने आक्रमक 30 धावा फटकावल्या. मुंबई आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.

  • 13 Apr 2022 09:06 PM (IST)

    शिखर धवन आऊट

    दमदार फलंदाजी करणारा शिखर धवन 70 धावांवर आऊट झाला. पंजाब किंग्सच्या 17.2 षटकात चार बाद 161 धावा झाल्या आहेत.

  • 13 Apr 2022 08:51 PM (IST)

    मुंबईला मिळाली मोठी विकेट, लियाम लिव्हिंगस्टोन OUT

    मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सची मोठी विकेट मिळाली आहे. लियाम लिव्हिंगस्टोनला जसप्रीत बुमराहने बोल्ड केलं. त्याने दोन धावा केल्या. पंजाबच्या तीन बाद 131 धावा झाल्या आहेत.

  • 13 Apr 2022 08:46 PM (IST)

    शिखर धवनची हाफ सेंच्युरी

    मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्सची दमदार फलंदाजी सुरु आहे. 14 षटकात त्यांच्या दोन बाद 128 धावा झाल्या आहेत. जॉनी बेअरस्टोला जयदेव उनाडकटने क्लीन बोल्ड केलं. त्याने 12 धावा केल्या. शिखर धवन 51 धावांवर खेळतोय.

  • 13 Apr 2022 08:27 PM (IST)

    अखेर मुंबई इंडियन्सला मिळाली पंजाबची पहिली विकेट

    अखेर मुंबई इंडियन्सला पंजाबची पहिली विकेट मिळाली आहे. कॅप्टन मयंक अग्रवाल मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद झाला. 32 चेंडूत त्याने 52 धावा केल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकार होते. 10 षटकात पंजाबच्या एक बाद 99 धावा झाल्या आहेत.

  • 13 Apr 2022 08:22 PM (IST)

    पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवालची शानदार हाफ सेंच्युरी

    पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवालने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली. 9 ओव्हरमध्ये पंजाबच्या बिनबाद 90 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल 52 आणि शिखर 34 धावांवर खेळतोय.

  • 13 Apr 2022 08:09 PM (IST)

    मुंबईचा विकेट मिळवण्यासाठी संघर्ष

    सात षटकात पंजाब किंग्सच्या बिनबाद 70 धावा झाल्या आहेत.

  • 13 Apr 2022 08:04 PM (IST)

    पंजाब किंग्सने मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं

    पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं. पंजाब किंग्सच्या बिनबाद 65 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल 38 आणि शिखर धवन 18 धावांवर खेळतोय.

  • 13 Apr 2022 07:57 PM (IST)

    मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर मयंक अग्रवालचा हल्लाबोल

    पंजाब किंग्सचा कॅप्टन मयंक अग्रवालने मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. मुरुगन अश्विनने पाचव षटक टाकलं. या ओव्हरमध्ये मयंकने एक चौकार, दोन षटकार लगावले. पंजाबच्या बिनबाद 53 धावा झाल्या आहेत.

  • 13 Apr 2022 07:53 PM (IST)

    चार ओव्हर्स पूर्ण

    जयदेव उनाडकटने चौथ षटक टाकलं. पंजाब किंग्सच्या बिनबाद 36 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल 17 आणि शिखर धवन 12 धावांवर खेळतोय.

  • 13 Apr 2022 07:46 PM (IST)

    मयंक अग्रवाल-शिखर धवनची जोडी मैदानात

    पंजाब किंग्सची फलंदाजी सुरु आहे. तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. मयंक अग्रवाल-शिखर धवन ही सलामीची जोडी मैदानात आहे. पंजाबच्या बिनबाद 30 धावा झाल्या आहेत.

  • 13 Apr 2022 07:10 PM (IST)

    अशी आहे पंजाब किंग्सची Playing -11

    मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह

  • 13 Apr 2022 07:08 PM (IST)

    अशी आहे मुंबई इंडियन्सची Playing -11

    मुंबई इंडियन्सच्या संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. रमणदीपच्या जागी टायमल मिल्सचा समावेश करण्यात आला आहे.

  • 13 Apr 2022 07:06 PM (IST)

    रोहितने टॉस जिंकला

    मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्स प्रथम फलंदाजी करणार आहे. पुण्यात हा सामना होत आहे.

  • 13 Apr 2022 06:59 PM (IST)

    पॉइंटस टेबलमध्ये काय आहे स्थिती?

    पंजाब किंग्सचा संघ दोन विजय आणि दोन पराभवांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. मागच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभूत झालेल्या पंजाब किंग्सचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. सलग चार पराभवांमुळे मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

  • 13 Apr 2022 06:57 PM (IST)

    पॉइंटस टेबलमध्ये काय आहे स्थिती?

    पंजाब किंग्सचा संघ दोन विजय आणि दोन पराभवांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. मागच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभूत झालेल्या पंजाब किंग्सचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. सलग चार पराभवांमुळे मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

Published On - Apr 13,2022 6:54 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.