Suryakumar Yadav Controversy : सूर्यकुमारला एक पुरस्कार देताना IPL मध्ये गडबड झाली का?

Suryakumar Yadav Controversy : सूर्यकुमार यादव डिजर्व करत नव्हता, तो अवॉर्ड त्याला दिला. तो कुठला पुरस्कार आहे? हे चुकून झालं असेल, तर हा पुरस्कार डिजर्व प्लेयरला मिळणार का? अजूनपर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत.

Suryakumar Yadav Controversy : सूर्यकुमारला एक पुरस्कार देताना IPL मध्ये गडबड झाली का?
Suryakumar-yadav
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 12:44 PM

मुंबई : सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये येतो, तेव्हा काय होतं, त्याचा नमुना 9 मे च्या संध्याकाळी वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळाला. सूर्याच्या वादळात RCB उद्धवस्त झाली. 200 धावांच टार्गेटही कमी वाटलं. मुंबई इंडियन्सला 20 ओव्हर खेळण्याची सुद्धा गरज भासली नाही. सूर्याला त्याच्या या परफॉर्मन्ससाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. जे योग्य आहे. पण त्याचवेळी त्याला आणखी एक पुरस्कार मिळाला, ज्यासाठी तो अजिबात डिजर्व नव्हता.

पावरप्लेमध्ये दोन झटके बसल्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचा डाव संभाळला. त्याने इनिंगला वेग दिला व टीमला विजयी शेवटापर्यंत नेऊन सोडलं. या कामगिरीसाठी त्याला जितके पुरस्कार दिले जातील, तितके कमी आहेत. या अवॉर्ड्समध्ये असाही एक पुरस्कार आहे, ज्यासाठी खरंतर सूर्या पात्र नव्हता.

सूर्याचा अधिकार नव्हता, तो पुरस्कार त्याला मिळाला

35 चेंडूत 83 धावांची तुफान इनिंग खेळल्यानंतर एका पुरस्कारावर सूर्यापेक्षा दुसऱ्या कोणाचा अधिकार होता. हा पुरस्कार सूर्याला देऊन चूक झाली. ज्याला मिळायला पाहिजे होता, त्याला मिळाला नाही. हे चुकून झालं किंवा दुसर काय आहे, त्या बद्दल माहित नाही. मुंबई आणि बँगलोरची मॅच संपल्यानंतर हे झालं.

सूर्या नाही, तर या पुरस्कारासाठी कोण होता पात्र?

तुम्ही विचार करत असाल, हा कोणता पुरस्कार आहे? जो सूर्याला नाही, दुसऱ्या कोणाला तरी मिळायला पाहिजे होता. हा रुपे ऑन द गो 4s अवार्ड आहे. मॅचमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. सूर्याने सर्वाधिक चौकार मारले नव्हते. त्याने सिक्स नक्कीच जास्त मारलेले. पण चौकारांच्या बाबतीत ग्लेन मॅक्सवेल त्याच्यापुढे होता.

कोणी जास्त फोर मारले?

मॅक्सवेलने मॅचमध्ये 8 फोर मारले. सूर्याच्या बॅटमधून फक्त 7 चौकार निघाले. मग, तुम्ही सांगा, या पुरस्कारावर सूर्याचा अधिकार कसा? मुंबई इंडियन्सने मॅचनंतर सूर्याचा अवॉर्ड घेतलेला फोटो शेयर केला. त्यात रुपे पुरस्कार त्याच्याकडे आहे. चूक कोणी केली?

आता हा प्रश्न आहे, की चूक कोणी केली? अवॉर्ड लिस्ट बनवणाऱ्याने की, कॅमेऱ्यासमोर वाचणाऱ्याने. हे चुकून झालं असेल, तर हा पुरस्कार ग्लेन मॅक्सवेलला देणार का? अजूनपर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.