MI vs RR IPL 2022: बटलरची बॅट आजही तळपली, Mumbai Indians ला विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य
MI vs RR IPL 2022: राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सहाबाद धावा केल्या आहेत. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक 67 धावा केल्या.
मुंबई: डी.वाय.पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (MI vs RR) सामना सुरु आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील हा 44 वा सामना आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सलग आठ सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे टीम रोहितला वाढदिवसाची विजयी भेट देण्याचा प्रयत्न करेल. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. अशी कामगिरी फक्त मुंबईच्या टीमने करुन दाखवली आहे. पण सध्या हाच तो मुंबई इंडियन्सचा संघ का? असा प्रश्न पडला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरु आहे.
जोस बटलरची दमदार खेळी
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सहाबाद धावा केल्या आहेत. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक 67 धावा केल्या. मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात जोस बटलरचीच बॅट तळपली होती. त्याने शतकी खेळी साकारली होती. आज त्याला तशी खेळी करता आली नाही. पण त्याने अर्धशतक मात्र जरुर झळकावलं. त्याने 52 चेंडूत 67 धावा केल्या. यात पाच चौकार आणि चार षटकार होते.
Solid effort with the ball. ?
Time now to chase it down. ?#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #RRvMI pic.twitter.com/dhOqQIdtn9
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2022
त्याच्या व्यतिरिक्त संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल आज चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. डावाच्या अखेरीस आर.अश्विनने फटकेबाजी केली. त्यामुळे राजस्थानला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. मुंबईकडून शौकीन, राइली मेरेडिथ यांनी प्रत्येकी दोन-दोन तर डॅनियल सॅम्स आणि कार्तिकेयने एक विकेट घेतला.