MI vs RR : 1000 व्या मॅचमध्ये ‘शर्मा जी Vs शर्मा जी’, बर्थ डे सेलिब्रेशनआधी रोहित समोर डबल धोका
MI vs RR : आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात काय असणार हे ‘शर्मा जी Vs शर्मा जी’. आयपीएलमधील हा ऐतिहासिक सामना असेल. रोहित शर्मासाठी सुद्धा आजचा दिवस खास आहे. कारण आज त्याचा बर्थ डे आहे.
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सची टीम आमने-सामने असेल. हा फक्त एक सामना नाही, तर ऐतिहासिक मॅच असेल. कारण IPL इतिहासातील हा 1000 वा सामना आहे. मुंबई आणि राजस्थान या दोन टीम्स साक्षीदार असतील. या 1000 व्या मॅचमध्ये ‘शर्मा जी Vs शर्मा जी’ असाही एक सामना असणार आहे. एकाबाजूला रोहित शर्मा, तर दुसऱ्याबाजूला संदीप शर्मा असेल.
संदीप शर्मा या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये दाखल झालाय. राजस्थानच्या कामगिरीत सातत्य दिसतय, त्यात संदीप शर्माचा रोल महत्वाचा आहे. चेन्नई विरुद्ध त्यांच्याच घरात राजस्थानच्या विजयात संदीप शर्माचा रोल महत्वाचा होता. आता वानखेडे स्टेडियमवर संदीप शर्मा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल.
1000 व्या सामन्यात रोहित शर्मा vs संदीप शर्मा
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा विरुद्ध राजस्थानचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माच रिपोर्ट कार्ड चांगलं आहे. टी 20 मध्ये रोहितने आतापर्यंत संदीपचे 42 चेंडू खेळलेत. या चेंडूंवर रोहितने 37 धावा केल्या आहेत. संदीपने 4 वेळा रोहितला आऊट केलय. म्हणजेच संदीप शर्मा विरोधात रोहित शर्माच्या खात्यात ना चांगल्या धावा आहेत, ना स्ट्राइक रेट आहे.
रोहितच बर्थ डे सेलिब्रेशन खराब करणार का?
रोहित शर्माचा आज 36 वा वाढदिवस आहे. राजस्थानचा हा शर्माची रोहितचा 36 वा बर्थ डे खराब करु शकतो. रोहितच बर्थ डे सेलिब्रेशन खराब करण्यात संदीपला अनुभवी सहकारी अश्विनची साथ मिळू शकते. रोहितला काय कराव लागेल?
आर.अश्विनने रोहित शर्माला टी 20 मध्ये 120 चेंडू टाकलेत. त्यात मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनने 110 धावा केल्या आहेत. अश्विनने रोहितला 3 वेळा आऊट केलय. मुंबईला या मॅचमध्ये विजय हवाच आहे. रोहित शर्मा त्याचा 36 वा वाढदिवस संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करेल. रोहितला संदीप शर्मा आणि आर.अश्विनचा चांगला समाचार घ्यावा लागेल.