MI vs SRH IPL 2023 High lights : मस्ट वीन मॅचमध्ये मुंबईचा SRH वर मोठा विजय

| Updated on: May 21, 2023 | 7:46 PM

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad IPL 2023 Live Score in Marathi : प्लेऑफच आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज काहीही करुन मुंबई इंडियन्सला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना जिंकावाच लागेल. फक्त जिंकून चालणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.

MI vs SRH IPL 2023 High lights : मस्ट वीन मॅचमध्ये मुंबईचा SRH वर मोठा विजय
MI vs SRH IPL 2023

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये आज IPL 2023 मधला 69 वा सामना झाला. सनरायजर्स हैदराबादसाठी फक्त प्रतिष्ठा राखण्यापुरत या सामन्याच महत्व होतं. पण मुंबई इंडियन्ससाठी ही मॅच ‘करो या मरो’ होती. प्लेऑफच आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला आजची मॅच जिंकावीच लागणार होती. त्यानुसार मुंबई इंडियन्सच्या टीमने आज सरस खेळ दाखवला. सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी दिलेलं 201 धावांच लक्ष्य मुंबईने 18 व्या ओव्हरमध्ये पार केलं. मुंबईने 12 चेंडू आणि 8 विकेट राखून SRH वर मोठा विजय मिळवला.

कॅमरुन ग्रीनची सेंच्युरी हे मुंबईच्या विजयाच वैशिष्टय ठरलं. त्याने 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 8 फोर आणि 8 सिक्स आहेत. कॅप्टन रोहित शर्मा आणि ग्रीनची जोडी आज चांगलीच जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माला आज महत्वाच्या सामन्यात सूर गवसला. त्याने 37 चेंडूत 56 धावा करताना 8 फोर, 1 सिक्स मारला. आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच  रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्स सामन्यावर लक्ष असणार आहे. त्यावर मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा प्रवेश अवलंबून आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 May 2023 07:28 PM (IST)

    MI vs SRH Result IPL 2023 : मुंबई जिंकली

    मस्ट वीन मॅचमध्ये मुंबईने SRH वर मोठा विजय मिळवला. हैदराबादच 201 धावांच लक्ष्य मुंबईने 12 चेंडू राखून पार केलं. मुंबईने SRH वर 8 विकेटने विजय मिळवला. मुंबईकडून कॅमरुन ग्रीनने 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. यात 8 फोर आणि 8 सिक्स आहेत.

  • 21 May 2023 07:08 PM (IST)

    MI vs SRH Result IPL 2023 : 16 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    16 ओव्हर अखेरीस मुंबईच्या 2 बाद 180 धावा झाल्या आहेत. 24 चेंडूत विजयासाठी 21 धावांची गरज आहे.

  • 21 May 2023 07:03 PM (IST)

    MI vs SRH Result IPL 2023 : 15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    15 ओव्हर अखेरीस मुंबईच्या 2 बाद 160 धावा झाल्या आहेत. 30 चेंडूत विजयासाठी 41 धावांची गरज आहे.

  • 21 May 2023 06:57 PM (IST)

    MI vs SRH Result IPL 2023 : रोहित शर्मा बाद

    मुंबईला दुसरा झटका. कॅप्टन रोहित शर्मा OUT झाला. मयंक दागरच्या बॉलिंगवर नितीश कुमार रेड्डीने कॅच घेतली. 37 चेंडूत 56 धावा करताना रोहितने 8 फोर, 1 सिक्स मारला.

  • 21 May 2023 06:53 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : मुंबई सुस्थितीत

    13 ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या 1 बाद 148 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 36 चेंडूत 56 आणि कॅमरुन ग्रीन 33 चेंडूत 73 धावांवर खेळतोय.

  • 21 May 2023 06:35 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : मुंबईची तुफान बॅटिंग

    रोहित शर्मा आणि कॅमरुन ग्रीन तुफान बॅटिंग करतोय. 10 ओव्हर्समध्ये मुंबईच्या 1 बाद 114 धावा झाल्या आहेत. कॅमरुन ग्रीन 23 चेंडूत 52 आणि रोहित शर्मा 27 चेंडूत 44 धावांवर खेळतोय. ग्रीनने 4 फोर 5 सिक्स मारले आहेत. रोहितने 6 फोर, 1 सिक्स मारलाय.

  • 21 May 2023 06:31 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : कॅमरुनन ग्रीनच तुफान

    9 ओव्हर्समध्ये मुंबईच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. कॅमरुन ग्रीन 22 चेंडूत 52 आणि रोहित शर्मा 24 चेंडूत 35 धावांवर खेळतोय. ग्रीनने 4 फोर 5 सिक्स मारले आहेत. रोहितने 4 फोर, 1 सिक्स मारलाय.

  • 21 May 2023 06:12 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : पावरप्लेमध्ये मुंबईची चांगली सुरुवात

    पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सच्या 1 बाद 60 धावा झाल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा 16 चेंडूत 16 धावा आणि कॅमरुन ग्रीन 11 चेंडूत 30 धावांवर खेळतोय.

  • 21 May 2023 05:54 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : मुंबईला पहिला झटका

    3 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सच्या 1 बाद 24 धावा झाल्या आहेत. भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर इशान किशन 12 चेंडूत 14 रन्सवर आऊट झाला. त्याने 1 फोर, 1 सिक्स मारला. त्याने ब्रूककडे कॅच दिली. आता कॅप्टन रोहित शर्मा आणि कॅमरुन ग्रीनची जोडी मैदानात आहे.

  • 21 May 2023 05:25 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : हैदराबादच्या 200 धावा

    विवरांत शर्मा 47 चेंडूत 69 धावा आणि मयंक अग्रवाल 46 चेंडूत 83 धावा यांच्या फलंदाजीच्या बळावर सनरायजर्स हैदराबाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 200 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला विजयासाठी 201 धावांच लक्ष्य दिलं आहे. मुंबईने अखेरच्या ओव्हर्समध्ये थोडी चांगली गोलंदाजी केली. मुंबईकडून आकाश मधवालने 4 ओव्हर्समध्ये 37 धावा देत 4 विकेट घेतल्या.

  • 21 May 2023 05:10 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : मयंक अग्रवालच्या 83 धावा

    18 ओव्हर्सचा खेळ पूर्ण. हैदराबादच्या 3 बाद 180 धावा. मयंक अग्रवाल 46 चेंडूत 83 रन्सवर आऊट. ग्लेन फिलिप्स 1 रन्सवर बाद. हेनरिच क्लासेन आणि कॅप्टन एडन माक्ररम मैदानात

  • 21 May 2023 04:52 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : हैदराबाद 160 च्या पुढे

    16 ओव्हर अखेरीस हैदराबादच्या 1 बाद 168 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल 82 धावा आणि क्लासेन 8 धावांवर खेळतोय.

  • 21 May 2023 04:43 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : मुंबईला मिळाली पहिली विकेट

    अखेर मुंबई इंडियन्सला पहिली विकेट मिळाली आहे. ओपनर विवरांत शर्माला मधवालने रमणदीप सिंहकरवी कॅच आऊट केलं. त्याने 47 चेंडूत 69 धावा केल्या. यात 9 फोर 2 सिक्स आहेत.

  • 21 May 2023 04:38 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई

    मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सचा संघर्ष सुरु आहे. 13 ओव्हरमध्ये हैदराबादच्या बिनबाद 130 धावा झाल्या आहेत. ओपनर विवरांत शर्मा 45 चेंडूत 68 आणि मयंक 33 चेंडूत 53 धावांवर खेळतोय. विवरांतने 9 फोर, 2 सिक्स मारले आहेत. मयंक अग्रवालने 7 फोर, 1 सिक्स मारला आहे.

  • 21 May 2023 04:23 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : मुंबईला विकेट मिळत नाहीय

    मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सचा संघर्ष सुरु आहे. 10 ओव्हरमध्ये हैदराबादच्या बिनबाद 93 धावा झाल्या आहेत. ओपनर विवरांत शर्माने 36 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. यात 7 फोर, 1 सिक्स आहे. मयंक अग्रवाल 24 चेंडूत 35 धावांवर खेळतोय.

  • 21 May 2023 04:03 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : हैदराबादची चांगली सुरुवात

    पावरप्लेच्या 6 ओव्हर अखेरीस हैदराबादच्या बिनबाद 53 धावा झाल्या आहेत. विवरांत शर्मा 24 चेंडूत (27) आणि मयंक अग्रवाल 12 चेंडूत (21) धावांवर खेळतोय.

  • 21 May 2023 03:59 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : 5 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    5 ओव्हर अखेरीस हैदराबादच्या बिनबाद 43 धावा झाल्या आहेत. विवरांत शर्मा (18) आणि मयंक अग्रवाल (20) धावांवर खेळतोय.

  • 21 May 2023 03:36 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याला सुरुवात

    मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद सामन्याला सुरुवात झाली आहे. जेसन बेहरनडॉर्फने पहिली ओव्हर टाकली. हैदराबादच्या बिनबाद 5 धावा झाल्या आहेत. विवरांत शर्मा आणि मयंक अग्रवालची जोडी मैदानात आहे.

  • 21 May 2023 03:33 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : सनरायजर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

    मयंक अग्रवाल, विवरांत शर्मा, एडन मार्करम (कॅप्टन), हेनरिक क्लासन, हॅरी ब्रुक, नीतीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंह, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक

  • 21 May 2023 03:08 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : मुंबईची प्लेइंग इलेव्हन

    रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल

     Our squad for #MIvSRH: ?

    1️⃣1️⃣: Rohit (C), Ishan (WK), Cameron, Surya, David, Nehal, Jordan, Chawla, Jason, Kartikeya, Madhwal

    ? Subs: Ramandeep, Vishnu, Stubbs, Tilak, Warrier#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL

    — Mumbai Indians (@mipaltan) May 21, 2023

  • 21 May 2023 03:03 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : रोहित शर्माने जिंकला टॉस

    मुंबई इंडियन्ससाठी आज हैदराबाद विरुद्धचा सामना ‘करो या मरो’ आहे. या मॅचमध्ये मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. मुंबईने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हैदराबादची टीम बॅटिंगसाठी मैदानात उतरेल.

  • 21 May 2023 03:00 PM (IST)

    MI vs SRH IPL 2023 Live Score : मुंबईला विजय हवाच

    आयपीएल 2023 च्या ग्रुप स्टेजचा आज शेवटचा दिवस आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना होणार आहे. प्लेऑफ प्रवेशाची आशा जिवंत ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला मॅच जिंकावीच लागेल.

Published On - May 21,2023 2:58 PM

Follow us
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.