IND vs AUS: भारतात येण्याआधी ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी, दिग्गज खेळाडू बाहेर
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे हे दोन खेळाडू भारताविरुद्धच्या सीरीजमध्ये खेळू शकणार नाहीत....
सिडनी: ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाची टेस्ट टीम फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येईल. त्यावेळी दोन्ही टीम्समध्ये कसोटी मालिका होईल. भारत दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये त्यांचा एक मुख्य खेळाडू दिसणार नाही. त्या खेळाडूच नाव आहे, मिचेल मार्श. या ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडरची डाव्या घोटाची शस्त्रक्रिया झाली आहे. याच कारणामुळे तो भारताविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार नाही.
कधी दुखापत झाली?
मार्श तीन महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहण्याची शक्यता आहे. दुखापतीमधून पूर्णपणे बरा होईपर्यंत क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला टीममध्ये स्थान देण्याची घाई करणार नाही. मार्शला त्याच्या दुखापतीमधून सावरण्यासाठी पूर्ण वेळ दिला जाईल. मार्श बऱ्याच काळापासून या दुखापतीमुळे त्रस्त होता. ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीजच्यावेळी ही दुखापत पुन्हा उफाळून आली.
आम्ही त्याच्यासोबत आहोत
वर्ल्ड कपआधी मार्च महिन्यात भारताविरुद्ध वनडे सीरीज होणार आहे. तो, पर्यंत मार्श फिट होईल अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली यांनी ही माहिती दिली. “मिचेल आमच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहे. दुखापतीमधून सावरण्यासाठी आम्ही त्याला पूर्ण सहकार्य करु. मार्च महिन्यात भारताविरुद्ध वनडे सीरीज होईल. तो पर्यंत ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवडीसाठी तो उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे” असं बेली म्हणाले.
फक्त ऑस्ट्रेलियन टीमलाच झटका नाही, तर….
मिचेल मार्श बाहेर गेल्याने फक्त ऑस्ट्रेलियन टीमलाच झटका बसलेला नाही. बिग बॅश लीगमधील टीम पर्थ स्कॉचर्ससाठी सुद्धा हा झटका आहे. दुखापतीमुळे तो बीबीएलच्या पुढच्या सीजनमध्ये खेळू शकणार नाही.
हा ऑलराऊंडरही बाहेर
मार्शशिवाय ऑलराऊंडर ग्लेम मॅक्सवेलही या टेस्ट सीरीजमध्ये खेळू शकणार नाही. मॅक्सवेलही दुखापतीमधून सावरतोय. ऑस्ट्रेलियाची टीम फेब्रुवारी-मार्चमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरीजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या सीरीजमध्ये चार कसोटी सामने खेळले जातील. भारतीय टीमने मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यांना त्याच्या देशात हरवलं होतं. याआधी भारताने 2018 साली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवलं होतं.